
अंधारखुणा
पुसटशा वाटेवरी
होत्या अंधारखुणा
वेळेनुसार हरवल्या
जुन्या पाऊलखुणा||१||
काळोख्या वाटेवरती
दबकत चालत आहे
वाऱ्याची झुळूक येता
वाटे कोणीतरी पाहे||२||
मनात वाटते भिती खूप
अंधाऱ्या रात्री चालताना
होई जीव कासावीस
मागे वळूनी पाहताना||३||
एकटाच निवांत बसता
अंधारखुणा आठवती
डरडरून घाम फुटता
सभोवती पिंगा घालती||४||
हळूहळू चालत जाता
मिटतो असा अंधार
येता प्रकाशाचा किरण
होई जीवन हे साकार||५||
जुन्या आठवणींच्या त्या
मिटाव्या साऱ्या अंधारखुणा
उजेडाची मिळता सोबत
दिसाव्यात त्या पाऊलखुणा||६||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
======