महिला ज्योतिर्विद अध्यक्षपदी प्रा.स्मिता गिरी

महिला ज्योतिर्विद अध्यक्षपदी
प्रा.स्मिता गिरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी

पुणे: 2023-2024 कालावधीसाठी महिला.ज्योतिर्विद या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ज्योतिर्विद प्रा.स्मिता गिरी यांची निवड संस्थापक, सल्लागार
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी, नुकत्याच
झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत जाहिर केली.

तसेच दुसरी आंतराष्ट्रीय महिला.ज्योतिर्विद परिषद (ऑफ.लाईन) दिवाळी 2023 नंतर लगेचच घेणार असल्याचे डाॅ.घाणेकर यांनी कळवले आहे.आगामी वर्षभराच्या काळात, 28मे2023रोजी महिला.ज्योतिर्विदची 50वी एक दिवशीय परिषद पुण्यात घेणार असल्याचे प्रा.गिरी यांनी सांगितले.
ज्योतिषी तुमच्या भेटीला, विनामूल्य
ज्योतिष मार्गदर्शन शिबीर, महिला.ज्योतिर्विदांची व्याख्यानमाला,
वुमन ॲस्ट्राॅलाॅजर ॲवाॅर्ड आदि विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

महिला.ज्योतिर्विद संस्था 2009 पासून अविरतपणे ज्योतिष शास्त्राचा प्रचार.प्रसार कार्यासाठी योगदान देत आहे. आत्तापर्यंत अगणित
महिला.ज्योतिर्विदांनी या व्यासपीठाचा लाभ घेतला आहे.2017 मधे महिला.ज्योतिर्विद संस्थेची पहिली आंतरराष्ट्रीय महिला.ज्योतिर्विद परिषद
माॅरिशस येथे झाली.पुण्यासह मुंबई, बडोदा,गोवा, बेळगाव, सोलापूर, नाशिक आदि विविध ठिकाणी राज्यस्तरीय परिषदा घेण्यात आल्या तर कोरोना काळापासून
आत्तापर्यंत सुमारे 25 ऑनलाईन परिषदा घेण्यात आल्या.

2023-2024 एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढील कार्यकारिणी
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जाहिर केली.आहे अध्यक्ष-प्रा.स्मिता गिरी, कार्याध्यक्ष-डाॅ.रजनी साबदे,सउपाध्यक्ष-संजिवनी मुळे, सचिव-डाॅ.सविता महाडिक, कोषाध्यक्ष-ॲड.सुनीता पागे, जनसंपर्क अधिकारी – चित्रा दीक्षित

महिला.ज्योतिर्विद संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी परिषदेस वसुधा क्रिएशन संस्थेच्या अध्यक्षा आणि वर्ल्ड लिटरेचर संस्थेच्या निमंत्रक वसुधा नाईक यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles