
संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूलचे मुख्याध्यापक ‘फादर वॉल्टर डिसूजा’ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
दादरा नगर हवेली, प्रतिनिधी
सिलवासा: गेल्या 100 वर्षापासून दादरा नगर हवेलीच्या दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या ज्ञानमाता एज्युकेशन सोसायटी खानवेलच्या संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूल, दुधनीचे मुख्याध्यापक ‘फादर वॉल्टर डिसूजा’ यांचा वाढदिवस आज दिनांक ०८ एप्रिल रोजी शाळेतील सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संत फ्रान्सिस स्कूल दुधनी या नामांकित शाळेचे मुख्याध्यापक फादर वॉल्टर डिसुझा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. फादरांचे अभिष्टचिंतन करून पंचारतीने औक्षण केले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांची आठवण करून त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मॅनेजर फादर सिल्वेस्टर हे उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले.
याप्रसंगी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरीष्ठ शिक्षक प्रशांत ठाकरे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले.