शिलाई देवी संस्था मुंबई बेझे गावातील जत्रा उत्साहात संपन्न

शिलाई देवी संस्था मुंबई बेझे गावातील जत्रा उत्साहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रतिनिधी वसुधा नाईक

मुंबई: शिलाई देवी संस्था, मुंबईतर्फे दरवर्षी दहा दिवस अगोदर येऊन
बेझे गावात जत्रेचे सुंदर असे नियोजन केले जाते. बेझे हे गाव तालुका त्र्यंबकेश्वर या नाशिक जिल्ह्यातील आहे. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने बरेच नागरिक दर्शनाला येतात.

इथले गावकरी आणि कार्यरत असलेले चव्हाण परिवार आणि त्यांचे सहकारी या जत्रेत उत्तम मनोभावी सेवा करून शिलाई देवी जत्रा पार पडली जाते.
हनुमान जयंतीच्या दिवशी या देवीची आरती पूजा करून पालखीची पूजा करून पालखी ही सर्व गावकऱ्यांच्या दर्शनासाठी लाभा घ्यावा म्हणून देवीची पालखी ही गावातून मिरवणुक काढून ती परत मंदिरात येऊन पालखीचा सोहळा संपन्न करतात.

या जत्रेला आजु बाजूला जी गावे आहेत त्यातले ही भक्तभावी दर्शनासाठी येतात आणि मुंबईकर येतात. संपूर्ण परिवार दर्शन घेऊन प्रसन्न होतात आणि आनंदाने जत्रेचा आनंद घेतात ही जत्रा तसे दोन दिवस चालते. या गावात लोककलेला तमाशा ही रात्रभर असल्याने म्हणून लोककला घराघरात पोहचली जाते. या जत्रेत दरवर्षी हजारोच्यावर भक्तभावी येतात.
या ठिकाणी संतोष चव्हाण, चेतन चव्हाण यांचे आणि कार्यरत मित्र परिवार सरपंच, पोलीस नेहमी यांचे ही सहकार्य असत. या शिलाई देवीच्या जत्रेची परंपरा मुंबईत राहणारे श्री मधुकर भट्टे आणि यांच्या सहकार्याने अजून चालू ठेवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles