डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते आहेत; आ. इंद्रनील नाईक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते आहेत; आ. इंद्रनील नाईकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद प्रतिनिधी

पुसद: बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. समाजातील सर्व स्तराच्या उन्नतीचा मूलमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व महिलांचे आणि सर्व वंचित शोषित पीडित समाजाचे उद्धारकर्ते आहेत असे प्रतिपादन आमदार इंद्रनील नाईक यांनी केले. पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुनी पंचायत समिती पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्व समितीच्या उद्घाटन प्रसंगी पहिले पुष्प गुंफत्तांना बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक आमदार इंद्रनील नाईक होते. तर प्रमुख अतिथी म्हणून धम्मक्रांती प्रज्ञा पर्वाचे संस्थापक अध्यक्ष भिमरावदादा कांबळे. धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२३ चे अध्यक्ष किशोर कांबळे. तहसीलदार एकनाथ काळबांडे, गट विकास अधिकारी, संजय राठोङ. दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत वासनिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे ङाँ.भन्ते खेमधम्मो. अर्जुनराव लोखंडे, देवेंद्र खडसे, अविनाश भगत, विठ्ठलराव खडसे, विश्वास भवरे.अरुण पाईकराव अशोक भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles