‘जीवनगाणे म्हणजे, जीवन जगण्याची कला’; संग्राम कुमठेकर

‘जीवनगाणे म्हणजे, जीवन जगण्याची कला’; संग्राम कुमठेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

असे जगावे,छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

अहो आश्चर्य वाटते,लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून…खरंच मानवी जीवन आपल्याला लाभलेलं वरदानच आहे.जीवन म्हटल्यावर सुख-दुःख या गोष्टी आल्याच…आपण सुखात आहोत म्हणून मातायचं असतं का ? किंवा दुःखात आहोत म्हणून खचायचं असतं का ? तर नाही ना पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे…उतू नका मातू नका दिला वसा सोडू नका.

माझे आई वडील मला लहाणपणी सांगायचे “खाऊन माजायचं पण टाकून देऊन माज दाखवायचा नाही.” किती हा साधा सोपा सिद्धांत जगण्याचा…’जीवन जगण्याची कला म्हणजेच; जीवनगाणे होय’. जीवनात सुख-दुःख, प्रेम-राग, आपुलकी-तिरस्कार, जिव्हाळा-द्वेष अशा अनेक घटनांची सरमिसळ होत असते.म्हणून दुःखामुळे,तिरस्कारामुळे वा द्वेषामुळे जीवन सोडून द्यायचे का ? आकाशात ढगांची गर्दी झाली की मोर पिसारा फुलवून आनंदाने नाचू लागतो. सौंदर्याचा अभिमान बाळगणारा तोच मोर जेव्हा स्वतःच्या पायाकडे पाहतो तेव्हा नाराज होतो. आपण तर माणसं…खूप बुद्धिमान आहोत. म्हणूनच स्तुती-निंदेच्या मोहात न अडकता जीवनाचा आनंद घेणे म्हणजेच जीवनगाणे होय.

मुख्य प्रशासक राहुलदादांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी “जीवनगाणे” हा विषय दिला नि अनेक शब्दप्रभूंनी अप्रतिम शब्दफुले उधळून जीवन गाण्यात रंग भरण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे.
“रूसव्या फुगव्यांना निरोप द्यावा.सदासर्वदा स्वानंद घ्यावा.” डॉ.मंजुषाताई साखरकर यांच्या ओळी तसेच “कधी सुखाचे कधी दुःखाचे,
प्रसंग येत राहतील जीवनी ” बी.एस.गायकवाड सरांच्या ओळी आणि “समाधानाचे सूर लावून,आयुष्याला संगीत द्यावे” प्रकाशदादा गोधणे यांच्या ओळी शिवाय “ऊठ-सूट आळवू नये,आपल्या दुःखाचे रडगाणे,तन्मयतेने गातच राहावे तालासुरात जीवनगाणे.” विष्णूदादा संकपाळ यांच्या ओळी खूप काही सांगून जातात.

झाले गेले विसरून जावे
पुढे-पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे

शांता शेळके यांनी हे जीवन खूप सुंदर आहे हेच सांगितले आहे. जीवन प्रवासात कुठे हिरवळ,कुठे वाळवंट,कुठे खाचखळगे,कुठे उंच पर्वत तर कुठे खोल दऱ्या.उत्तुंग पर्वतशिखरे व अथांग महासागरे या सर्व गोष्टींचा आनंद घेत प्रवास केला तर जीवनगाणे संगीतबद्ध केल्याचा आनंद स्वतःला घेता येतो नि यातून जीवन सुंदर असल्याचीच प्रचिती येईल.

“जीवनगाणे” विषय देताना मुख्य प्रशासक राहुलदादांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची नितांत गरज आहे हेच तर सांगायचे नसेल ना. कोणताही विषय देताना शिलेदारांच्या लेखणीला शब्दांचे धुमारे फुटावेत.बुद्धीचा कस लागावा.त्यांची साहित्यिक उंची वाढावी हाच विचार असतो हे मी पाहत आलोय.आज मुख्य परीक्षक म्हणून नवीन जबाबदारी सर्वेसर्वा राहुलदादा व पल्लवीताई यांनी दिली.ती जबाबदारी निःपक्षपातीपणे पार पाडण्याची कसरत मी करीत आहे.कदाचित काही चुकलं वा कुणाचे मन दुखावले गेले तर मोठ्या मनाने माफ कराल अशी अपेक्षा करतो.परीक्षणीय लेखणीतून व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ..

मराठीचे शिलेदार समूहातील सर्व शब्दप्रभूंनी दैनंदिन दिलेल्या विषयाला लेखणीतून सर्वोत्तम न्याय द्यावा. काल्पनिक शब्दांच्या व आलंकारिकतेच्या मोहात वास्तविकतेपासून आपण दूर तरी जात नाही ना याचे भान ठेवून लेखन करावे.कविता हे नवसमाजनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. २१ व्या शतकात जगत असताना वैज्ञानिकतेला बगल देऊन काल्पनिक कथांचा उदो उदो करण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते.

“नको गुलामी नक्षत्रांची,भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्यांची,मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर
आयुष्याला उत्तर देणे हेच तर जीवनगाणे आहे…तूर्तास थांबतो. शब्दमर्यादेमुळे सर्वांच्या रचनांचा उहापोह करता आला नाही परंतु अतिशय सुंदर कवितांचा परीक्षणाच्या निमित्तानं रसास्वाद घेता आला त्याबद्दल पुनःश्च राहुलदादांचे व सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles