
महापुरुषांचा जन्मोत्सव
छत्रपती शिवाजी महाराज,
क्रांतीबा ज्योतिबा फुले,
आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ,आंबेडकर यां आपल्या, प्रेरणादायी महापुरुषांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रबोधन, विचार मंथन, करण्याचा हा एक अल्पसा वैचारिक प्रयत्न आहे.
समाजाला दिशादर्शक अशी आपली प्रतिभा आहे. गरज आहे, डोळस, आणि जागृत विचार पेरण्याची,म्हणून करूया वंदन महापुरुषांच्या कार्यास, आणि संघटित होऊ संघर्ष करू, अभिवादन करू वरील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करूया आम्ही शिक्षक=आमचे कर्तव्य,आणि जवाबदारी ओळखुया समाज ऋण फेडूया. पहिले पुष्प, सोनपेठ तालुका आणि सर्व जाणत्या शिलेदारांनी अर्पण केले,आणि एक आदर्श पायंडा घातला, सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
पुढील कोणत्या तालुक्यात, महापुरुषांचा जन्मोत्सवाचे 2रे पुष्प गुंफनार तें स्वयं स्फूर्तीने कळवावे🙏🏻नम्र विनंती कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा सोनपेठ आयोजित महापुरुषांचा जन्मोत्सव यशस्वीरीत्या संपन्न
परभणी जिल्ह्यात महामानवांना अभिवादन करण्यासाठी व महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महापुरुषांचा जन्मोत्सव साजरा करत आहे.
*छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा सोनपेठ येथे मोठ्या थाटामाटात दि.11.04.2023 रोजी संपन्न झाला*
या कार्यक्रमात संत गजानन महाराज जि.प.क सहकारी पतसंस्था सोनपेठ येथे अनु.जाती प्रवर्गातून का.शि.संघटना सोनपेठ चे सचिव *आयु.यशपाल सावंत* यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार जिल्हा कार्यकारिणी कडुन करण्यात आला.
या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन…
*आयु. सतिशरावजी कांबळे सर*
(विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना मराठवाडा विभाग)
तर प्रमुख पाहुणे…
*1.आयु.दिपक पंडित सर*
(जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी)
*2.मायादेवी गायकवाड ताई*
(जिल्हा उपाध्यक्षा का.शि सं परभणी ,संचालिका जि प एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी मानवत )
*3.व्ही.डी.कांबळे सर*
(जिल्हा उपाध्यक्ष,तथा संचालक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सह.पतसंस्था परभणी )
*4.विलास खरात सर*
तालुका अध्यक्ष का.शि संघटना मानवत हे उपस्थित होते
प्रमुख उपस्थिती मध्ये…..
*1.आयु. किशोर धिवार सर*(जेष्ठ मार्गदर्शक तालुका शाखा सोनपेठ)
*2.आयु.गोरवे साहेब*
मुख्याध्यापक प्रशाला सोनपेठ
*3.आयु्.कवडे साहेब*
केंद्रप्रमुख खडका
उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कास्ट्राईब शिक्षक संघटना सोनपेठ चे तालुका अध्यक्ष *आयु.लक्ष्मीकांत गायकवाड* यांनी केले आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष *आयु.अतुल आगळे* सरांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , कास्ट्राईबचे शिलेदार महादेव राठोड सर, गोविंद उदगिरे सर, विनोद दाढेल सर,गोविंद चाटे सर,सुकेश यादव सरांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते