
सीटूतर्फे कन्हान माल धक्का कर्मचाऱ्यांनी माथाडी कार्यालयासमोर आंदोलन
नागपूर: जनरल लेबर युनियन (सी आय टी यू ) तर्फे कन्हान रेल्वे स्टेशन वरील माल धक्का माथाडी कर्मचारी यांचे समस्यांबाबत आज माथाडी भवन येथे आंदोलन करून संचालक मंडळाच्या गिरव करून आपल्या विविध मागण्यांबद्दल संचालक मंडळाबरोबर बैठक केली.
दिवसें दिवस वाढत असलेली महागाई बघता कर्मचाऱ्यांचे पगार वाढत आहेत, इतरांची रोजी वाढत आहे परंतु कांहान माल धक्का मधील हमाल यांची हमाली माथाडी मंडळातर्फे अर्धी केल्या जात आहे. या विषयाला घेऊन आंदोलन करण्यात आले. हमाली दर पूर्वीप्रमाणे असावा, शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध असावी, शौचालयाची सुविधा असावी, रात्रीच्या वेळेस काम करताना पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी या मागण्याला घेऊन आंदोलन करण्यात आले.
बैठकीत सीटूचे प्रतिनिधी, कर्मचारी आणि माथाडीचे अधिकारी यांच्यामध्ये आज विविध विषयावर समन्वय साधण्यात आला. 25 एप्रिल रोजी माथाडी संचालक मंडळ सीटू पदाधिकारी, कामगार व कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने तोडगा काढण्याच्या निर्णय घेण्यात आला. बैठकीला सीटू अध्यक्ष मोहम्मद ताजुद्दीन, नागपूर जनरल लेबर अध्यक्ष राजेंद्र साठे, सरचिटणीस दिलीप देशपांडे, गुरुप्रितसिंग, नितीन ढोबळे प्रामुख्याने उपस्थित होते.