
जि.प.सायगव्हाण शाळेत महामानवास अभिवादन
समुद्रपूर: जि. प. उच्च प्रा शा सायगव्हाण ता समुद्रपूर जि वर्धा येथे आज १४ एप्रिल २०२३ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शा.व्य. समिती सायगव्हाणच्या वतीने महामानवास जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष गजानन उईके, उपाध्यक्ष संजूपाल म्हैस्के, राजूपाल म्हैस्के, अंगणवाडी सेविका चित्रा सोनवणे व मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणांची आज जगाला गरज असून त्याची प्रेरणाज्योत मुलामंध्ये प्रज्वलीत करणे महत्वाचे असल्याचे मुख्याध्यापक म्हणाले. याप्रसंगी मुलांना अल्पपोहार चिवडा, सोनपापडी, खोबरे वितरीत करण्यात आला. अभिवादन कार्यक्रमास सर्व विद्यार्थी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.