
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी
प्रा. तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया: अर्जुनी / मोर. – न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर काॅलेज अर्जुनी / मोर. येथे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समाजसुधारक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.राकेश उंदिरवाडे,प्रा. तारका रुखमोडे यांनी डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानमार्गावर चालून एका सुसंगठित समाजाची निर्मिती करूया. व आधी ज्ञानसाधनेने स्वतःला कर्तृत्ववान व परिपूर्ण बनवलं तर देशही चहुबाजूंनी परिपूर्ण बनतो. त्यासाठी स्वतःला आधी कार्यक्षम बनवणे महत्त्वाचे आहे. असा वैचारिक संदेश संस्थासचिव श्री.ओमप्रकाशसिंह पवार यांनी आपल्या भाषणातून दिला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन कार्याची माहिती लिना चचाणे यांनी दिली. कार्यक्रमाची सांगता भीम गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास बांडे, त्रिवेणी थेर, कुंजना बडवाईक, हीना लांजेवार, प्रतीक्षा राऊत, शीला बोरीकर यांनी सहकार्य केले.