
युनियन बँक एससीएसटी कर्मचारी संघटनेतर्फे महामानवास अभिवादन
नागपूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त युनियन बँक एससीएसटी कर्मचारी संघटना नागपूरच्या वतीने संविधान चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास क्षेत्र प्रमुख प्रशांत शाहू, उपमहाव्यवस्थापक, तसेच क्षेत्रीय कार्यालयात डॉ.बाबासाहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी क्षेत्र प्रमुख प्रशांत शाहू, उपक्षेत्र प्रमुख हरीश बैठा,शकेशव परचाके,अध्यक्ष युनियन बँक SCST कर्मचारी कल्याणकारी संघ, राजेश मेश्राम. मिलिंद वासनिक यांनी बाबासाहेब आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. वरील कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.