डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी

पुणे: विश्वविख्यात साहित्यिक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधून, त्यांच्या साहित्य क्षेत्रातील प्रदीर्घकालीन यशस्वी वाटचालीबद्दल न्यायिक लढा सेवा संस्था आणि भूमध्य तरुण मित्र मंडळ यांच्या तर्फे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते
प्रदान करण्यात आला.

संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास राऊत, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले, आघाडीच्या युवा कवयित्री आणि समर्पण संस्थेच्या सचिव प्रतिमा काळे, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या स्वाती दिवाण, कवी बाबा ठाकूर, आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.सत्कारानंतर डाॅ.घाणेकर यांनी सर्व साहित्य प्रेमींविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
समारोपात डाॅ.घाणेकर यांनी त्यांच्या सबकुछ. मधुसूदन एकपात्री कार्यक्रमाची झलक सादर करुन उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या साहित्य क्षेत्रातील यशस्वी वाटचालीस नुकतीच
50 वर्ष झाली. सर्वाधिक काव्यसंग्रहाचा विश्व विक्रम डाॅ.घाणेकर यांच्या नावावर आहे.त्यांची विविध विषयक 225 पुस्तकं प्रकाशित झाली असून काव्य,एकपात्री कार्यक्रम, लघुपट, अनुबोधपट, संपादन,
व्यंगचित्र, अक्षररेखाटन, हस्ताक्षर मनोविश्लेषण, ज्योतिष, गायन, शीळवादन आदि विविध क्षेत्रात
त्यांच्या नावावर 250 विश्वविक्रम असून त्यांना 500 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.पहिले विश्व साहित्य संमेलन, पहिले विश्व काव्यसंमेलन, पहिले ग्रामीण विश्व साहित्य संमेलन, पहिले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन निमंत्रित कवयित्रींचे संमेलन, हायकू..चारोळी..बाल साहित्य आदिविषयक सुमारे 100 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनांचे
अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून
सुमारे 50 विविध आंतरराष्ट्रीय परिषदांचेही अध्यक्षपद भूषविले आहे.
डाॅ.घाणेकर हे डहाळी अनितकालिकाचे संपादक आहेत.

भारतीय जनता पार्टी , भारत विकास परिषद, वंचित विकास आदि संस्थांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. दत्तोपासक स्व.ताई घाणेकर स्मृतिमंच, साहित्य गौरव, सप्तस्वर इंटरनॅशनल, मधुरंग, मधुस्वर,सा इंटरनॅशनल, सांजभेट, ह्युमन वेल्फेअर काॅसमाॅस ऑर्गनायझेशन, हाहाहाsssलाफ इंटरनॅशनल, हॅन्डरायटिंग ॲनॅलिसिस रिसर्च फौंडेशन, युनिव्हर्सल ऑस्ट्रेलियातील फौंडेशन, मिठू मिठू पोपट,समर्पण, आदि अनेक संस्था डाॅ.घाणेकर यांनी स्थापन केल्या आहेत. भारतासह 17 देशात गेल्या 60 वर्षात सबकुछ मधुसूदन ह्या एकपात्री कार्यक्रमाचे 76,000 हून अधिक विश्व विक्रमी प्रयोग केले आहेत.जागतिक पातळीवर टाॅप 100 मधे गौरवलेले डाॅ.घाणेकर हे एकमेव विश्वविक्रमवीर आहेत.डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना विश्वमहात्मा ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील
सर्वोच्च उपाधि प्राप्त झाली आहे.

2016 मधे 18 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्तरित्या रेग्युलस ता-यास सर डाॅ.मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा
हे नाव जाहिररित्या दिले गेले.
डाॅ.घाणेकर यांचे वर्ल्ड लिटरेचर संस्थेच्या निमंत्रक वसुधा नाईक, साहित्य गौरवच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक,महिला.ज्योतिर्विद संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष प्रा.स्मिता गिरी, सांजभेट संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप शुक्ल, अक्षर आनंद इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी , वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष सारिका सासवडे, आदिंनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles