महापौर बनविण्यासाठी बसपचा वार्ड चलो अभियान सुरू

महापौर बनविण्यासाठी बसपचा वार्ड चलो अभियान सुरूपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बहुजन समाज पार्टी नागपूर शहर वार्ड समीक्षा बैठक संपन्न_

नागपुर : दि.15 एप्रील रोजी दक्षिण विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाज पार्टीचे रामेश्वरी रोड वरचे शहर कार्यालय या ठिकाणी वार्ड समीक्षा बैठक घेण्यात आली होती.

बहण कु.मायावतीजी राष्ट्रीय अध्यक्ष बसपा यांच्या आदेशानुसार चलो गाव की ओर/अर्थात चलो वॉर्ड की ओर कार्यक्रम अंतर्गत.. महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी एड. सुनील डोंगरे महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव मा.विजयकुमार डहाट प्रदेश सचिव नितीन शिंगाडे प्रदेश सचिव सौ. रंजनाताई ढोरे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम शहर कोषाध्यक्ष उमेश मेश्राम महिला आघाडीच्या नेत्या सौ. रंजनाताई घरडे या आयोजकांन मध्ये नागपूर शहर कमिटीच्या वतीने शहर प्रभारी ओपुल तामगाडगे, प्रभारी विकास नारायणे, शहर महासचिव विशाल बनसोड, शहर सदस्य धनराज हाडके, सुमित जांभुळकर, हेमंत बोरकर, नागेंद्र पाटील, विनोद नारनवरे इत्यादी नागपूर शहर टीमच्या वतीने वॉर्ड समीक्षा बैठक मध्ये उपस्थिस्त होते.

जवळपास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती बघयांची होती. नागपूर शहराची 15 वार्ड कमिटीची सर्वप्रथम बैठक बोलवण्यात आली. आणि या वार्ड कमिट्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
नागोराव जयकर यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनात आपले मत मांडले आणि 132 बूथ संघटन बांधून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने स्मरण करून, त्यांच्या विचारांची सरकार बनवण्याचा धाडस आपल्या सर्वांना करायचा आहे असे आव्हानात्मक भाषण उपस्थितांना केले. त्यानंतर मान्यवर डोंगरेनी मार्गदर्शना आधी सर्वांना समोर बोलवून प्रॅक्टिकली सर्व वार्ड समित्यांना स्वागत करून त्यांच्या प्रोत्साहन वाढविला. आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसांनी कॅडर पाहायला मिळाले. जवळपास 13 वार्ड कमिटी चे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आणि नंतर डोंगरेनी आपल्या अध्यक्षीय भाषणा मध्ये बोलताना बहुजन समाज पार्टी ही देशातली तिसऱ्या राष्ट्रीय पक्ष असून केवळ पक्षच नसून ते एक राष्ट्रीय संघटन सुद्धा आहे. एक सामाजिक परिवर्तन आहे. स्त्रिया संघटनेमध्ये आपण सर्व काम करीत आहेत हे आपल्या करिता सौभाग्य आहे.
त्याच प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकरी, मिशनला मजबूत करण्याकरिता आपण आपल्या जीवनाच्या अमूल्य वेळ देऊन बहुजनांची सरकार बनवण्याकरिता एकत्र आले आहेत हे ऐतिहासिक आहे. आणि नागपूर शहरातील दीक्षाभूमी म्हणजेच नागभूमित बीएसपी चा महापौर या वेळेस नक्की होणार असा आत्मविश्वास उपस्थित महिला वर्गांना मोठ्या संख्येने पाहून त्यांनी आपले भाष्य केले.

त्यांचा या कॅडर मुळे बहुसंख्य लोकांनी आपले समर्थन दर्शवून बीएसपी संघटन मजबूत करण्याकरिता संकल्प केला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समीक्षा विस्तृत माहिती नागपूर शहर प्रभारी ओपुल तामगाडगे यांनी केले. समीक्षा वार्ड कमिटीच्या बैठकीमध्ये एकूण 13 वॉर्ड कमिटीचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी कार्यकारिणीचे लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सदस्य सुमित जांभूळकर यांनी केले. यामध्ये अध्यक्ष सौ.पूजा फाले सौ. सपना आशिष पाटील, बबिता रामटेके, सौ. सरिखा तामगाडगे, रंजना मून, सौ. उज्वला वानखेडे, सौ.सुमन बागेश्वर, सौ. राजकन्या गायकवाड, पदमा गणवीर, सौ.रामटेके नगर अध्यक्ष सौ.माधुरी निकोसे, सौ.कमलताई फोपरे, सौ. बोरकरताई. जाठत्रोडी 03 अध्यक्ष सौ.विद्याताई कांबळे, सौ. अंतुजी समुद्रे, सुदर्शन समाज सौ.अमिता बोरिया, सौ. पंचफुला तामगाडगे, कुंदा कागदे, विद्या मुरारकर, शासिकला ढाकणे, किरण घरडे, सौ माया चांदे, सुषमा मेश्राम, रत्नमाला बोरकर, सुलोचना बागडे, प्रत्येक बागडे, प्रमिला मेश्राम, ज्योतीताई भगत, पमा वाघमारे, सूर्या भगत, रंजना देशभ्रतार, शीला वंजारी, इत्यादी प्रमुख वार्ड कमिटीच्या महिला सदस्य आपल्या संपूर्ण सहकार्यासोबत उपस्थित होत्या. त्याच प्रमाणे शहर सदस्य म्हणून चंद्रमणी नगर अध्यक्ष पंकज माटे, बालाजी नगर अध्यक्ष अस्वदीप काळे, प्रदीप नाईकवाडे, सावित्रीबाई फुले नगरचे परमानंद टेंभुर्णी, शेखर धानोरकर, अंकुश मून, कैलाश नगरचे हेमंत बोरकर, अजय गायकवाड, नागेंद्र पाटील, नितीन काळे, दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष जितू पाटील, विलास मून, संजय भाऊ सोमकुवर हेमंत तामगाडगे, अश्विन पाटील आदर्श शेंडे, सावित्रीबाई फुले नगरचे वार्ड अध्यक्ष रवी पाटील, सदस्य आदिवासी समाजाचे सुंदर भालावी, विनोद नारनवरे, गजानन पाटील, दक्षिणचे .शंकर थूल, इत्यादी महिला सदस्य व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये समीक्षा वार्ड समिती संपन्न झाली. आभार शहर प्रभारी विकास नारायणे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles