
पैशाचं झाड
आई बाबा द्या ना
मला काही पैसे
दाखवील चमत्कार
करून काही ऐसे
बाबांनी तिला दिला
पैसा नवा कोरा
झाली बघून खुश
वाढला तिचा तोरा
गेली बागेत धावत
खोदला तिने खड्डा
पैसे टाकता बघून
हसत होता बुढ्ढा
आजोबा आजोबा
कराल ना लाड
लावले बघाना
मी पैशाचे झाड
उगवता झाड
घालीन मी पाणी
बघून पैसे झाडाला
गाईन मी गाणी
मला जे हवे
ते मी घेईल
त्या त्या वस्तूची
मालकीण मी होईल
खुश बघून तिला
बाबा आले जवळ
म्हणाले उचलून
दे थोडी सवड
पैशासाठी थोडी
मेहनत कर
नंतर येईल
पैसे भराभर
बाबा आता करेल
कामात मी वाढ
मिळेल मला मग
पैशाचे झाड !
पैशाचे झाड !
प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर