काहीतरी कमी राहिलेच

काहीतरी कमी राहिलेच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विविधांगी जीवन जगतांना
प्रयत्न माझा एवढाच
सारे सारे नाते जपण्याचा

तरीही शंका मनात
काहीतरी कमी राहिलेच
जेव्हा दुर्लक्ष करतात आपलेच

मी पुन्हा नात्याची झालर
विणायला घेते
शब्दांच्या सौंदर्याची किनार लावते,
तरीही काहीतरी कमी राहिलेच….

नेमके नाते निभावणे म्हणजे काय ?
या प्रश्नात मग् गुरफटत जाते
जणू नागाने मेंदूला वेढा घालावा…
काहीतरी कमी राहिलेच….!
पण नेमके काय ?

जो जसा आहे तसा स्वीकारणे
कुणाच्या रागाने दुःखी न होणे
तर, सुखात उतावीळ होऊ नये…
नात्यात जगतांना ,नात्यात पडताना
नको उणे…धुणे
प्रत्येक नाते हे सुंदर असते
ते जपणे, ही भावनांचं नात्याचे
विश्व सदाबहार ठेऊ शकते
अन्यथा, काहीतरी कमी राहिलेच…..
असे,म्हणण्याची वेळ शेवट पर्यंत येऊ शकते….

सीमा वैद्य
वरोरा,जि. चंद्रपूर
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles