नागपूरकरांच्या हक्काचे ४४ एकर अंबाझरी गार्डन विकले ९९ रुपात ९९ वर्षांसाठी

नागपूरकरांच्या हक्काचे ४४ एकर अंबाझरी गार्डन विकले ९९ रुपात ९९ वर्षांसाठी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_हजारो करोडची जमीन ९९ रुपयात विकण्यात शासन व प्रशासनाची मिली भगत_

_मा. विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांना दोषींवर कार्यवाही आणि सर्व करार रद्द करण्यासाठी आपचे निवेदन_

नागपूर: शहराला प्राणवायूचा पुरवठा करणारे, नागपुरातील प्रत्येकासाठी सहलीचे ठिकाण, मुलांना खेळण्याचे ठिकाण, वरिष्ट नागरिकांचे सकाळ संध्याकाळी फिरण्याचे ठिकाण म्हणून आजवर नागपूरची शान असलेले आमचे हक्काचे अंबाझरी उद्यान MTDC च्या माध्यमातून खाजगी व्यावसायिकांना विकण्याचे काम नागपुरातील प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातील सरकामधील पुढाऱ्यांनी केले आहे.

आमच्या हक्काचे ४४ एकर मधील भव्य असे उद्यान आता खाजगी कंपनीच्या माध्यमातून मोठमोठ्या इमारती, रिसोर्ट, विश्रामगृह बांधून करोडपती लोकांसाठी पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. एकूणच ४४ एकर जमीन फुकटात म्हणजे एक रुपया वर्षाप्रमाणे ९९ वर्षांसाठी म्हणजेच ९९ रुपयात विकण्याचा कारभार महसूल विभागाने केला आहे.

याबाबत आता पर्यंत झालेले सर्व करार रद्द करावेत आणि हे उद्यान पुन्हा नागपूर करांसाठी पूर्ववत चालू ठेवावे, सोबतच येथे असलेले डॉ आंबेडकर भवन सुद्धा पुन्हा बांधून जनतेच्या सेवत हस्तांतरित करावे यासाठी आज विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांना आम आदमी पार्टी च्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात राज्य IT हेड श्री अशोक मिश्रा, शहर संयोजक श्रीमती कविता सिंगल, जिल्हा संगठन मंत्री प्रताप गोस्वामी, शहर संगठन मंत्री शंकर इंगोले, राजेश गजघाटे, पूर्व विदर्भ संयोजक संजय हेडाऊ, अजय धर्मे, रोशन डोंगरे, पौनीकर, डॉ अमेय नारनवरे, प्रभात अगरवाल, सोनू फटिंग, रविंद्र गीदोडे, अजिंक्य करंबे, जवाद अहमद , नरेश महजन, श्याम बोकडे, पियुष आखरे, पंकज मेश्राम, गौतम कावरे, फईम अन्सारी, कृतल आखरे, स्वप्नील सोमकुवर, दीपक भातखोरे, विजय धकाटे, संजय बारापात्रे, आकाश वैद्य, गिरीश, इत्यादी उपस्थित होते. श्रीमती बिदरी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles