जीवनपथ

जीवनपथ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जीवन ही एक रेशीम गाठ आहे
आयुष्यात चढउताराची वाट आहे
कुणाचे जीवन विराट आहे
तर कुणाचे जीवन सुखद पहाट आहे

जीवनाच्या वाटेवर चालताना
दुखाचा पहाड चढावा लागतो
मग पहाडाच्या पायथ्याशी च
सुखाचा झरा उगम पावतो.

अपयशाच्या पायऱ्या चढून चढून
मन माझे वैतागून गेले
यशाचे सोनेरी किरण दिसताच
हृदया आनंदाने बहरून आले.

निस्तेज झालेल्या डोळ्यांनीही
स्वप्न पाहायला सुरुवात केली
सुकलेल्या ओठांवर पुन्हा एकदा
प्रयत्नांची हास्येकळी उमलली.

या जीवनाच्या मैदानावर
सुखदुःखाचा खेळ चालतच राहिला
आयुष्याचा रेशमी धागा
प्रत्येक रंगात खुलतच राहिला.

बेबीताई (अनु) बोईनवाड/नरवाडे,नांदेड.
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles