यातना भोगतांना

यातना भोगतांना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सारेच कसे इथले ,वेदनेला न पेलणारे
दुःख गिळूनही सारे, यातना भोगणारे

वाळवंटाला चटके सावलीचे कधी बसतात का रे?
अश्रूंना कधी वेदनांचे, भाव कळतात कां सारे?

दुःखाला सुखाने, काट्यात सोडून द्यावे
विव्हळणाऱ्या वेदनांनी मग, मुग गिळून बसावे

आक्रोश मनाचा कधी ,उमटतो मुख दर्पणावर
पाहतांना सारेच त्याला, बोलती फक्त मनावर

दुःख पिऊन भावनांनी, हृदयात दाटी केली
यातना भोगतांना अंतरीच्या, नयनांना जाग आली

पीळ जळला तरी इथे, सुंभ जळत नाही
यातना भोगतांना मनीच्या, दुःख इथले सरत नाही

व्रण ते अंतरातले ,न कधीही संपणार
क्षितिज वेदनांचे, असेच विस्तारत जाणार

अर्चना जगदीश मेहेर
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles