
महारथी
कर्तव्याचे तुम्ही शिलेदार
आपली ओळख जगभर
महारथी शोभता खरोखर
या जीवनाचे शिल्पकार!
घडविला इतिहास अमर
समाजात मानपान जरूर
कष्टातही जगलात भरपूर
आरूढ या सिंहासनावर !
नाही घेतली कधी माघार
पोहचलात या शिखरावर
पाया मजबूत हा निरंतर
शोभे राजा चित्रनगरीवर!
यशाचा महामेरू हा पार
घडविली ओळख दमदार
नमन तुला व्यासपीठावर
स्वाभिमान मैत्रीचा फार !
कारकीर्द कळते जरूर
मागे वळून पाहिल्यावर
नाही थांबलात वळणावर
झिजविले असे हे शरीर!
अभिमानाचा शिल्पकार
शुभ शुभेच्छा या वारंवार
अनोखा वाढदिवस फार
साजरा तुम्हीच करणार!
देतो शुभेच्छा मी दमदार
घ्यावा सदैव हा पुढाकार
यशाचे दीप उजळतील
जीवनात कित्येक हजार
माणुसकी जिंकली सर !!
अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
=======