महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर

महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

केलं जीवनाचं सोनं
दिली जगण्याची नवी दिशा,
खरचं आहे तू ज्ञानाचा अथांग महासागर
माझ्या बा भिमा….

गळ्यात होते मटके
कमरेला होता झाडू ,
राहायला नव्हते घर
आणखी काय व्यथा सांगू ,

तोडले ते मटके
तोडल्या त्या चालीरिती ,
स्वाभिमानाने जागतो आता आम्ही
नाही आम्हांस आता कोणाची भिती .

प्यायला सुद्धा मिळत नव्हते पाणी
अशी होती आमची दशा ,
केले सत्याग्रह चवदार तळ्याचे
आणि दिले हक्क आम्हास तूच बा भिमा

मंदिरात नव्हता आम्हास प्रवेश
जणू बाटत होता त्यांचा देव ,
करून सत्याग्रह काळाराम मंदिराचे
आणि दिले हक्क आम्हा सर्वांना समतेचे

केले आमच्यावर असे उपकार
ते फेडता फेडता ना कधी फिटणार ,
तोडल्या बेड्या गुलामीच्या
आता आम्ही सुद्धा आकाशात उंच उडणार..

नाव तुझे बा भिमा घेता
येते मनात स्फूर्ती ,
लिहून घटना भारताची
सा-या जगात गाजे तुझीच कीर्ती..
तुझीच कीर्ती ….
तुझीच कीर्ती ……

सागर गौ.गजभिये, नागपूर .
=====

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles