योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विशेष प्रतिनीधी उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतांनाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी मिळाल्यानंतर लखनऊमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने आणीबाणीची सुरु केलेल्या ११२ क्रमांकांवर संदेश पाठवून मी साम योगी यांना लवकरच मारीन अशी धमकी या व्यक्तीने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपर्क अधिकारी शिखा अवस्थी यांनी हा संदेश बघितला. या संदेशात मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या मेसेजचा स्क्रिन शॉट घेतला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ही धमकी देणारी व्यक्ती कोण आहे याचा आता पोलीस तपास घेत आहेत.

धमकी मिळाल्यानंतर ११२ च्या ऑपरेशन कमांडरने सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५०६, ५०७ आणि आयटी कायदा ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही . उत्तर प्रदेशात योगी सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. आठवडाभरापूर्वीही त्यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट बागपतच्या अमन रझा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती, या पोस्टमध्ये योगी यांना गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली होती, त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles