
अव्यक्त अबोली साहित्य मंचाचे तृतीय कविसंमेलन संपन्न
वर्धा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ वी जयंती निमित्त अव्यक्त अबोली मंचाने पुलगाव (जि वर्धा) येथे भव्य राज्यस्तरीय कविसंमेलन -२०२३ नुकतेच मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. कविसंमेलनाला नामवंत मान्यवरांनी हजेरी लावली.
संमेलनाध्यक्ष मा.डा भूषण रामटेके सर, पुलगाव, उद्घाटक मा. मनोहर शहारे सर, स्वागताध्यक्ष मा.हरिदास कोष्टी (काका) या मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.कविसंमेलनाच्या मुख्य आयोजिका मा.जयश्री चव्हाण, पुलगाव आणि मा.योगेश ताटे सर, नांदेड मा.शीला आठवले ताई,मा.सुनील पाटील यांच्या अथक परिश्रमाने आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात मा. प्रांजली प्रविण काळबेंडे वसई ,मा.प्रशांत दामले दर्यापूर, मा.संजय ओरके पुलगाव,मा.अरविंद पाटील वर्धा मा.नंदिनी शहारे यवतमाळ,मा.सिंहल मेंढे पुणे,मा.उषा घोडेस्वार भंडारा,मा.कुंदनभाऊ जांभुळकर…हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते. अव्यक्त अबोली मंचाच्या मार्गदर्शिका मा.शीला आठवले ताईंनी प्रास्ताविक मांडताना समुहाच्या भरभराटीची संकल्पना सांगितली.अव्यक्त अबोली मंचाने वटवृक्षाचे स्वरूप धारण करावे व सर्व साहित्यसेवामध्ये यशस्वीपणे वाटचाल सुरू ठेवावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
त्यानंतर मा.सुचिता मेहेंदर्गे बोईसर यांच्या मितवा काव्यसंग्रह प्रकाशन अतिथीच्या हस्ते संपन्न झाला
संमेलनाध्यक्ष मा.भूषण रामटेके सरांनी अव्यक्त अबोली मंचाच्या सर्व साहित्यिक धडपडीची प्रशंसा केली.अनेक नवोदित साहित्यिकांचा उल्लेख करीत साहित्य क्षेत्रातील आशावादी उज्ज्वल भविष्याची खात्री दर्शविली.
प्रमुख अतिथी मा.प्रांजली प्रविण काळबेंडे वसई यांनी आपल्या मनोगतात अव्यक्त अबोली मंचाच्या आयोजक मंडळाचे कौतुक करीत त्यांच्या साहित्यसेवेची प्रशंसा केली तसेच अव्यक्त अबोली मंचाच्या तिसऱ्या कविसंमेलनात आयोजकांकडून आग्रहाने या मंचाचे रूपांतर बहुद्देशीय संस्थेत करावे असे आश्वासन घेतले. आयोजक जयश्री चव्हाण आणि योगेश ताटे यांनी पुढील संमेलन हे संस्थेमार्फत राबविले जाईल अशी ग्वाही दिली.
दिग्गज गझलकारांच्या उपस्थित मुशायरा हर्षोल्लास संपन्न झाला तसेच तीस ते चाळीस सुप्रसिद्ध कवींनी कविसंमेलनात सहभाग नोंदविला.या सत्राचे अध्यक्षपद मा.प्रकाश बनसोड यांनी तर मा.राजेश नागुलवार, मा.स्नेहल सोनटक्के, मा. प्रीती वाडीभस्मे यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
कविकट्ट्यामध्ये मा.सिंहल मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली कविसम्मेलन संपन्न झाले त्यात मा.प्रवीण कांबळे नागपूर,मा.प्रकाश महामुनी बार्शी, मा.नंदिनी शहारे यवतमाळ,मा.उषा घोडेस्वार भंडारा,मा.अहिल्या रंगारी नागपूर, मा.प्रांजली काळबेंडे वसई यांनी विशेष उपस्थिती लावली.
अव्यक्त अबोली मंचाच्या वतीने मा.मंजुश्री पाटील यांच्या देखरेखीखाली सुग्रास जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.सर्व मान्यवरांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम सुंदररित्या संपन्न करण्यासाठी मा.जयश्री चव्हाण, योगेश ताटे,प्रविण भगत,शीला आठवले,सुनील पाटील,कुंदनभाऊ जांभूळकर,मा.शैलेश सहारे, मा.विनोदभाऊ बोरकर मा.दिलीप थुल यांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.