धक्कादायक !! देशातील 48 औषधे आणि हे टूथपेस्ट मानाकंन चाचणीत फेल

धक्कादायक !! देशातील 48 औषधे आणि हे टूथपेस्ट मानाकंन चाचणीत फेलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_वापर आणि सेवन ठरू शकते धोकादायक_

नवी दिल्ली: देशातील 48 औषधे निर्धारित मानकांची पूर्तता करत नाहीत, असे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड अँड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ला आढळून आले आहे. औषध प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. आजकाल सेल्फ मेडिकेशनचा प्रकार वाढला असून, जो घातक ठरू शकतो. यासाठी वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय औषधे घेऊ नये असा नेहमी सल्ला दिला जातो.

नॅशनल ड्रग रेग्युलेटर सीडीएससीओच्या म्हणण्यानुसार, मार्चमध्ये देशातील अनेक उत्पादन युनिटमधून 1497 औषधांचे नमुने घेण्यात आले होते, त्यांची चाचणी केली असता, 1449 औषधे मानकांची पूर्तता करतात परंतु 48 औषधांची गुणवत्ता निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.

ही अशी औषधे आहेत जी सामान्यतः मधुमेहविरोधी, प्रतिजैविक, कॅल्शियम किंवा हृदयरोगाशी संबंधित उपचारासाठी औषधे वापरली जातात. मल्टी-व्हिटॅमिन औषधांपासून ते एचआयव्हीसाठी वापरल्या जाणार्‍या रिटोनावीरचाही या यादीत समावेश आहे. एपिलेप्सी औषध गॅबापेंटिन, हायपरटेन्शन औषध तेलमिसार्टन, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन यांचाही या यादीत समावेश आहे.

याशिवाय या यादीत आयर्न आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्या, प्रोबायोटिक्स अशा अनेक मल्टीविटामिन गोळ्या यांचा समावेश आहे. तसेच, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, फॉलिक अॅसिड, अमोक्सीसिलिन, कॅल्शियम – आणि व्हिटॅमिन डी 3 गोळ्या, तेलमिसार्टन गोळ्या देखील असतात. या यादीत मेस्वाक टूथपेस्टचेही नाव आहे.

औषधांची चाचणी केली असता असे आढळून आले की, ती बनवण्यासाठी वापरलेली सामग्री प्रमाणित नाही, त्यातील घटकांचे प्रमाण किंवा चुकीचे लेबलिंग ही काही कारणे या चाचणीत समोर आली आहेत. नुकतेच सरकारने निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या प्रकरणी 18 फार्मा कंपन्यांचे परवानेही रद्द केले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles