
“आर्त” या मराठी गाण्यांच्या अल्बमला रसिकांचा भरभरुन प्रतिसाद
_”आर्त”ची गाणी All India Radio मान्यता प्राप्त_
नागपूर: शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्त्व मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शित केलेल्या “आर्त” या मराठी गाण्यांच्या अल्बम ला रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. त्यामधील 2 गाणी नुकतीच All India Radio ने मान्यता प्राप्त केली आहेत.
” विठ्ठला गे गीत माझे……”हा अभंग शास्त्रीय संगीत गायिका सौ. रसिका करमाळेकर यांनी गायला असून “पद टाकीन मी………” हे गीत हरहुन्नरी गायिका सौ. यामिनी पायघन यांनी गायले आहे. याचे संगीत संयोजन सूरमणी पं.प्रभाकर धाकडे यांचे असून ट्रॅक प्रसिद्ध सरोद वादक पुष्कर देशमुख यांचा आहे. अभंगाचे शब्द ॲड. माधव बोबडे आणि संजीवनी मराठे यांचे अनुक्रमे आहेत.
या आधी मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शीत केलेला “साद” या मराठी गाण्यांच्या अल्बम मधील पण 2 गाणी All India Radio ने मान्यता प्राप्त केली असून ती त्यांच्या प्लेलिस्ट मध्ये समाविष्ट झाली आहेत.
“आर्त” या अल्बम मधील मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शित केलेला पुढील अभंग सौ. यामिनी पाईघन यांच्या आवाजात लवकरच रसिकां समोर येतो आहे. हा अभंग राग कलावती आणि सोहनी या रागांवर आधारीत आहे. असेच रसिकांचे प्रेम आणि आशिर्वाद या पुढेही मिळत राहील असा विश्र्वास मनीष उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.