‘महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेच ठरताहेत ओझे’; नितेश राणेचे टिकास्त्र

‘महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेच ठरताहेत ओझे’; नितेश राणेचे टिकास्त्र



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा ठरणार_

मुंबई: महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा असेल. यानंतर वज्रमूठ सभा होणार नाही, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे ओझे झाले आहे. आणि हे ओझे किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. या टीकेला भाजपने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकावरुन राणे म्हणाले, एकाच दिवसात फरक पडेल असे वाटले नव्हते. राऊत यांचा चेहरा आज उतरलेला होता. असे त्यांच्याशी लढण्यात मजा नाही. राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल कमी झाला. राऊत म्हणायचे मी पवारांचा माणूस आहे. हे उद्धव ठाकरेंचे देखील नाहीत आणि शरद पवारांचे देखील नाहीत. मग हे राजकारणातले लावारीस आहेत का? असा उपरोधी सवालही त्यांनी यावेळी विचारला.

*बाळासाहेबांना शिव्या घालायचे*

राणे पुढे म्हणाले, राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. तो शिवसैनिक असण्याच्या बाता करतो. त्याला शिवसेनेबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हा चायनिज मॉडेल आहे. ओरिजनल नाही. लोकप्रभातला असताना हे बाळासाहेबांना शिव्या घालायचे.

*ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष नाहीत*

धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक शिवसेना नाव वापरत आहेत. हा निवडणुक आयोगाच्या निर्णयाचा अपमान आहे. तुम्ही शिवसेना म्हणू शकत नाही. तुम्हाला ठाकरे गट म्हणावे लागेल. याबाबत मी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष नाही. याबाबत निवडणुक आयोगाकडे तक्रार करावी यासाठी शिंदे साहेबांशी बोलणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles