डार्विनला अभ्यासक्रमातून काढून टाकणे म्हणजे, केंद्रीय पुस्तक मंडळाने केलेले सर्वोत्तम कार्य

डार्विनला अभ्यासक्रमातून काढून टाकणे म्हणजे, केंद्रीय पुस्तक मंडळाने केलेले सर्वोत्तम कार्यपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तिकडे उत्तरेत शालेय इतिहासातून तसे तर मुघल पण काढले गेलेले आहेतच. नथुरामने मारले म्हणून गांधी आणि कोबीला त्रास दिला म्हणून नेहरूंनासुद्धा लवकरच काढून टाकावे. बाबासाहेब तर तसेही फक्त नावाला होते… आता बाबासाहेब जगात भारी डॉक्टर होते आणि एका इंजेक्शनमध्ये कॅन्सरसुद्धा पूर्णपणे बरा करत वगैरे माहिती मुलांना शिकवण्यात यावी. भगतसिंगना व्हॅलेंटाईन डे दिवशी फाशी दिले होते हेही सांगणे आलेच. त्याशिवाय राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या सजग नागरिक बनणार नाहीत.

बाकी विज्ञानात … मोर अश्रू ढाळतो आणि ते पिवून लांडोर अंडी देते, बापू देवाचे अवतार आहेत, नागीण नागाच्या खुनाचा बदला घेते, गायीच्या शेणात सोने असते, गोमूत्र सर्वात उत्तम औषध आहे, सोळा सोमवारचे उपवास, नारायण नागबळी, वैभवलक्ष्मी व्रत, श्री यंत्र, धनवर्षा कुबेर यंत्र, काळ्या बाहुलीचे महत्त्व, दृष्ट काढणे, भानामती, करणी, हडळ आणि चेटकीण यामधला फरक, लिंबू-मिरची उतरवून टाकणे, पायात काळा दोरा बांधण्याचे महत्त्व, लेकरांना काळी तीट कुठे लावावी, कुंडली पाहणे, मंगळशांती, ग्रहणात घ्यावयाची काळजी, अंगावरुन आवरण काढणे, पिंडदानाचे महत्त्व… वगैरे महत्वाची शास्त्रीय माहिती मुलांना शिकवणे हे तर आपले आद्य कर्तव्य आहे! अमृतकाल अगदी जवळ दिसतोय आणि सोबत आपले राष्ट्रप्रमुख हे पुढे विश्वगुरू होणेसुद्धा फार दूर राहीलेले नाही 😊

– डॉ. विनय काटे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles