दत्तोपासक घाणेकर स्मृतिमंचतर्फे 15 नामवंतांना 2023 चे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान

दत्तोपासक घाणेकर स्मृतिमंचतर्फे 15 नामवंतांना 2023 चे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

पुणे : दत्तोपासक स्व.एकनाथ घाणेकर यांची 125वी जयंती आणि दत्तोपासक स्व.ताई घाणेकर यांचा 25 वा स्मृतिदिन यानिमित्ताने दत्तोपासक स्व.ताई घाणेकर स्मृतिमंचतर्फे संस्थापक, अध्यक्ष आणि
पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दत्तोपासक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते समाजातील विविध क्षेत्रातील 15 यशस्वीतांना राष्ट्रगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

“मनापासून केलेल्या ईश्वर भक्तीस शुध्द आचरणात जोड लाभल्यास ख-या अर्थाने जीवनाचे सार्थक होते. मातृपितृ ऋणांबरोबरच प्रत्येकाने समाजऋणांचेही भान ठेवले पाहिजे कारण समाजामधे मातृपितृतुल्य प्रेमाची क्षमता असते ” असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी या सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात केले.
भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, मधुरंग संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदा नाईक, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्ष कवयित्री प्रिया दामले, स्मृतिमंचच्या कार्याध्यक्ष शशिकला घाणेकर सोवनी , उपाध्यक्ष मेघना घाणेकर आदि मान्यवर मंडळी या सोहळ्यास उपस्थित होती.

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाच्या 419 व्या विश्वविक्रमी अनितकालिकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. ज्योतिर्विद डाॅ.सुवर्णा सुत्रावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याच सोहळ्यात ऋचा घाणेकर थत्ते यांनी दत्तगुरुंचे 24 गुरु या विषयावर उपस्थितांना प्रबोधन केले. उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी दत्तोपासक स्व.एकनाथ घाणेकर आणि स्व.ताई घाणेकर या दांपत्याने ताथवडे गावी दत्तसंप्रदायासाठी दिलेल्या प्रदीर्घकालिन त्यागपूर्ण योगदानाचा वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.तसेच जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी ब्रम्हध्यान
विषयक डाॅ.घाणेकर यांनी उपस्थित
साधकांसाठी ब्रम्हध्यान शिबिरही घेतले.

अविनाश थत्ते आणि आर्य थत्ते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शशिकला घाणेकर सोवनी, श्रीनिवास तेलंग, प्रिया दामले या मान्यवरांचीही याप्रसंगी भाषणे झाली.मेघना घाणेकर यांनी आभार मानले. पुरस्कारार्थींच्या वतीने वसुधा क्रिएशनच्या अध्यक्ष वसुधा नाईक, अभिनेते प्रदीप देवकर, ज्योतिर्विद श्यामल वाघ,पत्रकार आम्रपाली धेंडे,ज्येष्ठ साहित्यिक सुवर्णा जाधव, सांजभेट संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप शुक्ल तसेच गायक विलास दातार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद मिसाळ, त्र्यंबक बोरीकर, रंगकर्मी सतीश इंदापूरकर, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या सचिव अजिता मुळीक, युवा सामाजिक कार्यकर्ते जयंत हिरे आणि सारिका सासवडे यांनाही स्मृतिमंच तर्फे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मुरकेवार , प्रकाश साठे आणि आघाडीच्या युवा कवयित्री योगिता कोठेकर यांचाही याप्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कुलकर्णी, प्रदीप शिंदे आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles