अर्धशतकाचे शतकात रूपांतर….शतकी खेळी अविस्मरणीय

*🌐अर्धशतकाचे शतकात रूपांतर….शतकी खेळी अविस्मरणीय*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

➿➿➿➿💐🚩💐➿➿➿➿
*❇”विदूषक” बनून काव्यप्रवास सुरू झाला. लेखणीने “भरारी” घेण्याची तयारी दाखविली .दादांनी माझी “परीक्षा”घेतली नि मी त्यात उत्कृष्ट पास झालो.मराठीचे शिलेदार समूहाच्या “अक्षरांगणात” मनसोक्त बागडू लागलो.तेव्हा लेखणीला धार चढविण्यास “अधीर मन झाले” नि समूहाच्या गौरवशाली कार्यावर पहिला “पोवाडा” रचला नि पोवाडा सर्वांना आवडला. त्याचवेळी सर्वोत्कृष्ट रचनेचे “बीज” खोलवर रूजले होते.माझ्या लेखणीचे “लावण्य” दिवसेंदिवस उजळू लागले आणि मी मनात पक्क केलं नि लेखणीशी संवाद साधताना हळूच म्हणालो ,”तुझ्यासाठी कायपण” नि लेखणी लाजली ,सजली नि तिच्यात अन् माझ्यात “एकात्मता” निर्माण झाली. हळूच एके दिवशी “आगमन सोनपरीचे” झाले आणि “मनकवडा” असणाऱ्या राहूलदादांनी माझ्या हाती “धम्मचक्र” दिलं आणि ते पेलण्याची ताकद आपल्यात यावी यासाठी काय करता येईल याचाच विचार करू लागलो यामुळेच की काय माझ्या मनाला “वाचनप्रेरणा” मिळाली.माझ्या लेखणीतून प्रसवणा-या “अक्षरदुर्वा”हवेत गारवा असूनही मन मोहून टाकत होत्या त्यामुळे बोचरी “गुलाबी थंडी” हवीहवीशी वाटू लागली म्हणून सरळ “झोपाळा” बांधला नि ही “समयसूचकता” फक्त राहूलदादा,स्पृहाताई यांच्यामुळे माझ्यात आली त्यातून “मुर्तीभंजक” रचना आकारास आली आणि हा सर्व काव्यांगणातील व्याप सांभाळताना “माझी शाळा” सुंदर शाळा व गुणवत्तापुर्ण कशी होईल याच विचारातून मासिक सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा उपक्रम सुरू केला व दररोज पाच प्रश्न शाळेत लिहून देऊ लागलो यामुळे किर्ती व प्रसिद्धी मिळाली याचे सर्व श्रेय दादांच्या मराठी भाषा समृद्धी व सक्षमीकरणासाठीच्या मेहनतीला व तळमळीला जाते यात २०१७ साल कसं गेलं हे कळलंच नाही*

*♈तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट उपयोग कसा करायचा हे जर मला कुणी विचारलं तर मी फक्त राहूलदादाकडेच बोट दाखवेन. प्रसिद्धी व शुभेच्छांमुळे मन आनंदानं चिंब होऊन “सोनकांती” चमकू लागली आणि लेखणीला मी वचन दिले “तू तिथं मी” असं म्हणताच ती आनंदानं नाचू लागली नि ती “रानफूल झाले मी” म्हणून मला “लाभार्थी”च्या यादीत घेऊन मधुगंध उधळू लागली. मुक्तविहार करताना सर्वोत्कृष्ट “घटनेचा शिल्पकार” दाखविला आणि हाच तो “सुवर्णयोग”मी कधीही विसरू शकणार नाही.तेव्हापासून “सखी लावण्याची खणी” भासणारी ही “भारतमाता” जगात आदर्श का आहे हे समजू लागले नि “शब्दावाचून अडले सारे” सर्वोत्कृष्ट संदेश काव्यरसिकांना दिला आणि त्यांना तो खूपच आवडला नि “अविश्वासी” मनांना जोडणे “दुरापास्त” होतंय की काय अशी मनात शंका येऊ लागली नि त्याचवेळी “बेधुंद आसमंत” खंबीरपणे ओरडून मला सांगू लागला की “तुझेच धम्मचक्र हे” तारेल या विश्वाला. हा आत्मविश्वास लेखणीला बळं देऊ लागला. सर्वोत्कृष्ट “भुईचक्र” न बिघडू देता. भुईचंक्र बिघडतंय म्हणून नुसती ओरड करणाऱ्या “बेगडी” लोकांना हळूच दूर सारून “प्रकाशवाटा” दाखविल्याशिवाय मनाला “समाधान” वाटणार नाही असे माझं मन मला सांगू लागलं परंतु हे करताना लेखणीशी, माणुसकीशी “प्रतारणा” कधीही करायची नाही हे निश्चित केले आणि “क्षण हे सुखाचे” प्रत्येकाच्या जीवनात येत राहो या भावनेने २०१८ चा निरोप घेतला*
*🍁२०१९ मध्ये परत “तू तिथं मी” म्हणून लेखणीने खूपच लळा लावला. माझ्या चुकांना ” माफीचा साक्षीदार” म्हणून “काव्यदीप” सतत प्रज्वलीत ठेवण्याची शिक्षा मला देण्यात आली नि मी आनंदाने त्यासाठी तयार झालो.”स्वप्नकिनारा”सारखा मला खुणावत होता. स्वप्नकिनारा गाठून मस्त खळखळणा-या लाटांवर स्वार व्हावं नि बिनधास्त जीवनाचा आनंद घ्यावा असं वाटू लागलं नि त्याचवेळी मनात प्रश्नाचं “काहूर” माजलं होतं नि त्याचवेळी एक आवाज कानी पडला की “मनाला शोभलीस” असं किरण धरतीला म्हणत होता नि “धुकं दाटलेलं” त्यातच अधूनमधून “अग्निदेवता” तापलेली असताना आभाळमाया झाली नि परत सर्वोत्कृष्ट “क्षण आनंदाचे” काव्यांगणी अवतरले नि “महाराष्ट्र माझा” मी महाराष्ट्राचा आणि माय माझी मराठी म्हणत “झोका” घेतला नि त्या धडधडत्या हृदयातील “स्मृतीशेष” काही राहिलं का म्हणून विचार करत बसलेला असतानाच “मृगाची चाहूल” लागली नि खरंच मराठीचे शिलेदार जागतिक समूहाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटला “भाग्यशाली मी” असं वाटून मन आनंदानं नाचू लागले नि सर्वोत्कृष्ट “आषाढ घन” जोरात बरसतील या आशेने मराठीचे शिलेदार समूहातील “आम्ही वारकरी” आनंदानं फेर धरून पंढरीच्या वाटेवर रिंगणात नाचू लागला. भाळी अष्टगंध नि हाती भगवी पताका घेऊन माय मराठीच्या सेवेत देह झिजावा आणि माय मराठीच्या कुशीतच विसावा मिळावा या उदात्त हेतुने राहूलदादांची साथ कितीही मोठी वादळं आली तरी सोडणार नाही या ठाम विश्वासाने पाऊलं टाकत असताना “स्वप्नझेप” घेण्याची शक्ती,ऊर्जा पंखात भरण्याचं अफलातून कार्य राहुलदादांनी केलं.ते म्हणजे २६ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथे झालेल्या कवीसंमेलनाचे कवीसंमेलनाध्यक्ष म्हणून माझा सन्मान केला व माझ्या गुरूमाऊली डॉ.पद्माताई जाधव यांना प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अध्यक्षस्थान देऊन दोघांनाही “साहित्य सेवारत्न पुरस्कार २०१९ “देऊन गौरविण्यात आले.*
*📘किती मोठा मान, किती मोठा सन्मान त्याहीपेक्षा राहुलदादांची माय मराठी साठीची तळमळ हृदयाला भिडली. साहित्यसम्राट “लोकशाहीर फकिरा” अण्णा भाऊंच्या लेखनशैलीचा प्रभाव म्हणजे कष्टानं व्याकुळ झालेल्या जीवाला “क्षुधा” प्राशन करायला लावून “वेडे समर्पण ” काय व कसं असावं याच सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुलदादा.*

*🔘”अजाण वाट ” चालत असताना “भणंग ” झालेल्या माणसाला मरतुकड्या शरीरातील बलदंड मनाच्या “राष्ट्रपीता” महात्मा गांधींचे माझे सत्याचे प्रयोग, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख सारखी आत्मचरित्र वा पुस्तके वाचून वाचनसंस्कृती रूजवून “आम्ही वाचक” बनून वाचाल तर डोक्यात नक्कीच “दिव्यप्रकाश” चमकेल व नात्याची उसवलेली वीण घट्ट होईल व “प्रेमांगण” बहरेल हाच आशावाद मनी ठेवून दादांनी “फुलपाखरू” असणाऱ्या चंचल मनाला “काव्यनाद” लावण्याचा “अट्टाहास” धरला नि तो फळाला येत असल्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.*

*🍁काव्यफुलांचा सुगंध घेताना “मनःलहरी” तरंगू लागल्या व “डोळसं प्रेम” करण्याचा सावधपणा मनात घोंगावू लागला. नागपूरच्या व्यासपीठावर ज्येष्ठ कवी श्रीरामजी केदार व नागोरावदादा कोंपलवार यांच्या सोबत साहित्यिक चर्चा केली व “नवप्रेरणा” मिळाली आणि त्याच वेळेस परदेशी संस्कृतीचे “संक्रमण” भारतीय संस्कृतीत होत असल्याचा विषय चर्चिला जात होता. सकारात्मक दृष्टिकोनामुळे “निवळले मन” आणि परदेशी भारतीय संस्कृतीचा अभ्यास का करतीय याचे कोडे उलगडले. “प्रेमरहस्य” जाणताच माझा ” रंग कोणता” माझा धर्म कोणता हे सर्व प्रश्न बाजूला पडले व भारतीय व मानवता हाच माझा धर्म ही खूणगाठ मनात बांधली.*

*🟡कोरोनारूपी “गागरा” फैलावत असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या नि मन “डवूर” झालं परंतु “शब्दगदा” हाती घेऊन प्रहार करायला सुरूवात केला नि पुन्हा “दिव्यप्रकाश” डोक्यात चमकला आणि मनात उठलेली “वावटळ” काही प्रमाणात शमली.परंतु आजुबाजूला होणाऱ्या “चिलमी गप्पा” ऐकल्या नि पुरूषांच्या अहंकारी वृत्तीचा राग येऊ लागला.”अधुरी स्त्री” म्हणून हिणवणा-या मुर्दाड मनाच्या लोकांना सांगावं वाटतं थंडीच्या दिवसात हुडहुडीनं थरथरणा-या अंगाला मायेची ऊब फक्त आईनं “तुरपाई” केलेली गोधडीच देत असते.*
*🚩मराठीचे शिलेदार समूहात अनेक “काव्यचकोर” चातकासम शब्दफुलांचा सुगंध लुटण्यासाठी टपलेली कवीवर्य ताई व दादा आहेत. त्यांनी दिलेली कौतुकाची थाप अविस्मरणीयच असतात. आभाररूपी शब्दांची “पाठवणी” करून काव्यप्रवासाचा “उलगडा” मी करीत बसलो तर सुंदर पुस्तक तयार होईल.”धोंड्या” म्हणून हिणवताना उदास झालेला माझा “कोनाडा” माझंच खरं म्हणून आपलंच “तुणंतुणं” वाजविणा-या लोकांनी माझं “मृत्यूपत्र” जर वाचलं तर नाव ठेवणं सोपं पण नाव कमावणं किती अवघड असतं याची प्रचिती येईल परंतु कशाचीही “परतफेड” करतो म्हटलं तरी अत्यावश्यक प्रसंगी पुढं आलेला मदतीचा हात त्याची बरोबरी पुन्हा कधीच होत नसते.*
*🌈संकुचित प्रवृत्तीच्या लोकांच्या मनात नेहमीच “सर्पभय” असतं असंचा मला वाटतं परंतु विशाल हृदयाच्या,विचारांच्या माणसांच्या मनात आनंद “दुथडी”भरून वाहतो म्हणून अशीच माणसेही “हवास तू” म्हणत “आमच्यासारखे आम्हीच” जीवनाचा परमोच्च आनंद घेतात.”गनिमी कावा”करून आपली राजवट चालविणा-यांच्या विरोधात जेव्हा “मारबत” निघते तेव्हा तो क्षण टिपण्यासाठी”चेंगड” करणारी थोडकी नसतात.”स्वप्नरंग” उधळताना”विकलेली माणुसकी” पाहून मन हताश होते.त्याच वेळी “माझ्या मामाचे गाव” आठवले नि निराशा पळून गेली.*

*📘नेवासा येथे पार पडलेल्या अविस्मरणीय कार्यक्रमात “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०” देऊन गौरव केला.तिथूनच ख-या अर्थाने माझा “काव्यमहिमा” सातासमुद्रापार गेला. हे सर्व करीत असताना मुख्यप्रशासक राहुलदादा, पल्लवीताई, वैशालीताई, सविताताई, अरविंददादा, अशोकदादा, स्वातीताई, कल्पनाताई, विष्णूदादा, सुधाताई यांच्यामध्ये जी “एकात्मता” आहे ती अद्वितीय अशीच आहे.”पालखी काजव्यांची” जशी नयनमनोहर असते तशीच सर्व सहप्रशासक , संकलक, परीक्षकांचे कार्य आहे.*

*👩🏻झि+पोट्या -झिपोट्या …याचाच अर्थ झि म्हणजे झिंज्या…झिप-या आमच्याइकडं म्हटलं जातं आणि झिंज्या असणाऱ्या पोट्ट्या म्हणजे मुली असा अर्थ अंदाजाने काढलाच होता नि कवीवर्य पवनदांनी रचना टाकून सारा संभ्रम दूरच केला.याच “झिपोट्या” नी अनेक दिवसापासूनची प्रतिक्षा संपविली नि शतकी खेळी सार्थकी लागली. या काव्यप्रवासात कौतुकाची थाप देणाऱ्या सर्व ताई दादांचेही अंतःकरणापासून धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
*सर्व सहविजेत्यांचे सर्वोत्कृष्ट “अभिनंदन” करतोय व पुढील काव्यप्रवासाला शुभेच्छा देतो.सर्वोत्कृष्ट “शेवटचा आग्रह” की सर्वांनी अगदी काळजातील भाव शब्दात मांडा निश्चितच त्या हृदयस्पर्शी ठरतील. वेदनेला भावनेची फुंकर घातली की भावस्पर्शी शब्दगंध उदयास येतो.दगडालाही पाझर फुटेल अशी शब्दगुंफन केल्यावर काव्यवेल चिरकाल स्मरणात राहील व त्यासाठीची सर्वोत्तम “खातेवही” ठेऊन आयुष्यातील चढउतारांची नोंद ठेवा व योग्य वेळी शब्दरूपात मांडा नि पहा कमाल तुमचे शब्द हृदयाला भिडतील एवढीच अपेक्षा करतो व लांबलेली शतकी खेळी थांबवतो.धन्यवाद*

➿➿➿➿🌐🟡🌐➿➿➿➿
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles