
मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय पदाधिकारी मंडळाची सिलवासा येथे बैठक संपन्न
_बैठकीत पदाधिका-यांच्या कार्याचा गौरव_
सविता पाटील ठाकरे, कार्य.संपा. सिलवासा
सिलवासा: दादरा नगर हवेली सिलवासा येथे दिं.29/4/2023 शनिवारी सायंकाळी सहा वाजता मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय पदाधिकारी मंडळाची बैठक मा. अनंतराव निकम प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ निर्मलाताई पाटील, सहकार परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपानराव क्षिरसागर राष्ट्रीय कार्यालयीन सचिव कपिल पिच्छेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली.
अंत्यंत सुंदर नियोजन व महत्वपूर्ण चर्चा, कार्याचा आढावा घेतला असता दादरा नगर हवेली टीमच्या कार्याची प्रशंसा केली आणि आगामी काळातील कार्याचे नियोजन करण्यात आले. सिलवासा येथे पाच हजार मराठी समाज बांधवांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणारे भाऊसाहेब डेरे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी संदीप पाटील, योगेश सोनवणे, राजेंद्र वाघ साहेब,शरद बोरसे, प्रफुल्ल सोनवणे, भरत सोनवणे , राजेंद्र वाघ सर, प्रशांत ठाकरे इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आयोजित बैठकीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. येत्या काळात मराठा सेवा संघाचे काम कसे वाढेल यावर चर्चा झाली. बैठकीस जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे , मेघा वाघ , प्रांजली देवरे आदी जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.