माझा अमेरिका प्रवास

माझा अमेरिका प्रवासपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दिनांक २६/०४/२०२३ मुंबईहून पॅरिसला जाण्यासाठी मुंबईच्या शिवछत्रपती विमानतळावर बसले होते. आमचे प्लेन 2.10 Am होते. आम्ही 8 वाजताच विमानतळावर पोहोचलो. 9 ला चेकइन झाले. नंतर आम्ही निवांत बसलो. समोरच्या खुर्चीवर एक बाई.. चिंतेत दिसत होत्या. अस्थिर वाटत होत्या. दोघींची नजरानजर झाली. आणि तिने मला खुणावले. मी तिच्याजवळ जाऊन बसले. आणि तिने बोलायला सुरुवात केली. “मी सुरतहून आलीये. आईला व्हेंटिलेटेरिवर ठेवले आहे. मी गेले की काढून टाकणार आहेत. माझा भाऊ बॉम्बे मधे असतो. त्याच्याकडे व्हिसा नाही.”

एवढे बोलून त्या रडू लागल्या. आणि म्हणल्या की “तुम्हाला सांगावे असे मला वाटले.” मी बोलले, “ओके, Garg होते. आपले मन मोकळे करावे असे वाटते. तुम्ही शांत रहा. नीट प्रवास करा.काळजी घ्या.” तिने मन मोकळे केले..1 वाजला प्लेन मधे बसण्यासाठी आमचे पासपोर्ट, बोर्डिंग पास चेक केला. व आम्ही एकदाचे विमानात प्रवेश केला. (Airfrance Airlines ) जेवण ठीक, नाश्ता ठीक होता. ९ तासांचा प्रवास करून मग थेट परिसला उतरलो. पुढील काँनेकटिंग डेट्रोइटचे प्लेन ९ तासाने होते. मग आम्ही बसलो निवांत.. लोक यायचे आपल्या प्लेन मधे बसायचे. आम्ही मात्र तिथेच. पण येणाऱ्या माणसांची धांदल पाहत बसलो. चालायचे, बसायचे, व्हाट्सअप कॉल करायचे असा आम्ही टाइम पास केला. डायरी लिहिण्याची सवय असल्याने अनुभव लिहिले. कविता केल्या.

बरोबर ८ तासाने परत पासपोर्ट, बोअर्डिंगपास चेक झाले. प्रश्न विचारले गेले. आता विमानात जावून बसलो. डेट्रोईटचा प्रवास सुरु झाला. इथे जेवण अजिबात आवडले नाही.
नाश्ता ठीक होता. बरोबर ९ तासाने डेट्रोईटला पोहोचलो. बॅग्स सर्वात शेवटी आल्याने आम्हाला बाहेर पडायला उशीर झाला. बाहेर आलो तर, माझा मुलगा आदित्य आणि माझी बहीण जावू वाट पाहतच होते. आम्हाला पाहताच त्यांना आणि मला रडू आवरले नाही. मग आम्ही गळाभेटी घेतल्या व घरी गेलो. असा हा 27 तासांचा प्रवास सुखकर झाला. या प्रवासात आठवणीत राहणारी विविध माणसे भेटली.

वसुधा नाईक, पुणे
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles