नजरेतला भाव आणि श्वासातला गाव ओळखतो…तोच खरा गंध प्रीतीचा….!

नजरेतला भाव आणि श्वासातला गाव ओळखतो…तोच खरा गंध प्रीतीचा….!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण_

किती वेळ वाट बघायची तुझी ? बघ केसांतला मोगराही सुकून गेला. वाराही बटांना उधळून गेला. नजरही क्षीण झाली. तनमनाला बघ ग्लानी आली. पण ठाऊक आहे मला…तू येणार…तू येणार वाऱ्याच्या वेगाने… आणि हलकेच भाळीचे चुंबन घेऊन म्हणणार…अगं मी हा इथेच तर होतो तुझ्या समीप… अगदी तुझ्या श्वासात… फक्त काळ वेगळा…गती वेगळी म्हणून तनाने जरा दूर .पण कायमच तुझ्या समीप…गंध प्रितीचा दरवळत…!

आणि तू म्हणशीलच…अगं, तुझ्या केसांना उधळणारा वाराही मीच होतो…शुभ्र मोगऱ्याला हुंगून घेणाराही मीच होतो…ग्लानी आली तुझ्या तनमनाला… तुझ्या देहातील रंध्रांना स्पर्शणारा मीच होतो… फक्त ते होतं आपलं अशारीरी प्रेम…अगदी जगावेगळं….मनाशी मनाने जुळलेलं….त्या कान्हा आणि गोपिकांसारखं, कृष्ण आणि सवंगड्यांसारखं… आणि म्हणशीलच तर नक्की त्या राधा आणि कृष्णासारखं….खरंय रे वेडी मीच होते. नाही ओळखू शकले त्या प्रीतीला… नजरेतील भाव आणि श्वासातील आपला गाव एकच होता. मग कुठे आला दुरावा…? हा तर नित्य वाहणारा गंध प्रीतीचा…होता..गंध प्रीतीचा होता….!

खरंय ना मराठीचे शिलेदारांनो…आपलंही असंच असतं…किती दूर दूर राहतो आपण शरीराने पण समूहाच्या माध्यमातून जुळलेली आपली नाती… नित्यनेहमी गंध प्रीतीचा दरवळत राहते. शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मुख्य प्रशासक राहुल पाटील यांनी दिलेला ‘गंध प्रीतीचा’ हा विषय खरेतर मन हरखून गेला. कितीतरी लडिवाळ रचना समूहात आल्या. सखा साजणी पासून धरती आकाशाच्या ओढीपर्यंत गंध प्रीतीचा पसरला. कधी हलकेच तो सुमन पुष्पांतही रमला. तर कधी अमंगळ तो विश्वासघाताने वेदनादायी ठरला….म्हणूनच डॉ. सौ. मंजूषाताई साखरकर यांच्या रचनेतील…

*गंध प्रितीचा*
*विश्वासाचा हा मेळ*
*सुंदर खेळ*

या ओळी मनास स्पर्शून जातात. खरंय ना कुठल्याही नात्यांत विश्वास हवा, आदर हवा. मग ते नाते असो पती-पत्नीचे, प्रियकर-प्रेयसीचे अथवा मैत्रीचे…तरच गंध प्रीतीचा आसमंतात भरून जाईल.

चला तर गंध प्रीतीचा पसरवण्या खुल्या दिलाने आरंभ करू या… सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!

*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles