
शरद पवारांनी अशी वाचवली राष्ट्रवादी; नाहीतर अजित पवार ४० आमदरासह….
मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्याची घोषणा केल्यानंतर विविध बाजूंनी वेगवेगळी वक्तव्ये समोर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही काही धक्कादायक विधाने समोर आली आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कायम ठेवून राजीनामा न दिल्यास अजित पवार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार फोडल्यातच जमा होते. मात्र, शरद पवारांनी राजीनामा देऊन पक्ष वाचवल्याचे विधान शिंदे गटाने केले आहे.
शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी हा दावा केला आहे. हा मुद्दा पुढे करत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शरद पवार हे मोठे नेते असल्याचं म्हटलं आहे. त्यांची विचारसरणी दूरची आहे. उद्धव ठाकरेंसारखी चूक त्यांना करता आली नाही. त्यांनी शहाणपण दाखवले. राष्ट्रवादीला फुटण्यापासून वाचवले. आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत (शिंदे – फडणवीस ) येणार आहे.