
राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपादाचा राजीमाना मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर आंदोलन सुरू आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.