शनिवारीय काव्यस्तंभ कविता स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : धुंदी सत्तेची☄*
*🍂शनिवार : ०६ / मे /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

प्रजेला ठेवून पायदळी,
झाले मगरूर सत्ताधीश…
फोडून सरकारी तिजोरी,
कसे झाले बघा कोट्याधीश…१

जनतेच्या पैश्यावर यांची,
नजर असते हो वाकडी…
संधीचा फायदा घेऊन हे,
डल्ला मारती हो घडोघडी…२

नाही जनतेची पर्वा मुळी,
नाही कुठलीचं हो काळजी…
जुमल्यावर जुमले देती,
शिजविण्या आपली डाळ जी…३

स्त्रीच्या अब्रूसंगे खेळ खेळे,
लाज वाटेना नितीमत्तेची…
धूर्त लबाड ह्या लांडग्याच्या,
अंगी भरली धुंदी सत्तेची…४

जागे व्हा मतदार बंधूनो,
जागा दाखवूया यांना यांची…
*सुधाकरा* हिच वेळ आहे,
दाखवून देण्या यांना चाची…५

*सुधाकर भगवानजी भुरके गुमथळा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह,नागपूर*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

धुंदी सत्तेची ही
असते बघा नेत्यांना
विचार करत नाही
मग आश्वासने देतांना

सत्तेसाठी साम दंड भेद
दिसतात बघा आजमावतांना
एक एक मतांसाठी
दिसतात घरोघरी फिरतांना

आली का एकदा सत्ता
दिसतो बघा भाव वाढतांना
काहीपण प्रसिद्धीसाठी
दिसतात बघा बोलतांना

गोरगरीब जनतेच्या पाठीत
खंजीर दिसतात खुपसतांना
या पाच वर्षाच्या काळात
दिसतात आपले घर भरतांना

या सत्तेच्याच जोरावर
दिसते बघा लवतांना
जनता झाली जागृत तर
धुंदी सत्तेची दिसेल उतरतांना

संविधानाचा आदर करा
‘सुधा’ची लेखणी बोले समजवतांना
विचार करा मतदार राजे हो
योग्य लायक नेता निवडतांना…

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

पैशाभवती फिरते दुनिया
माणुसकीचा घोटूनी गळा
तुंबडी आपली भरण्यासाठी
स्वार्थसाधूंचा भरला मेळा

धुंदी सत्तेची माज पैशांचा
लिलाव इथे नीतिमत्तेचा
खेचाखेची ही सत्तेसाठी
अवलंब भल्याबुऱ्या मार्गांचा

भरला इथे बाजार चोरांचा
जनहिताला लावूनी टाळा
व्यवहार इथे आकडेवारीचा
खुर्चीवरती नेत्यांचा डोळा

दीनदुबळ्यांना वाली नुरला
खोट्याचा होतसे बोलबाला
आश्वासने दिली मिळे सत्ता
उदोउदो यांचा सदा चालला

मनी सर्वांनी करावा विचार
मानवतेची जपणूक करा
आत्मभान जागृत ठेवावे
लोकहिताचाही संकल्प करा

*सौ वृंदा(चित्रा)करमरकर*
सांगली जिल्हा सांगली
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

पक्षामध्ये ठाण मांडून
बसले असतात नेते
पैशा पुढे त्यांना नसते
कुठलेही नातेगोते

राजकारणात पाऊल ठाम
चालतांना त्यांची मक्तेदारी
सत्तेसाठी भांडून उठतात
एकमेकांच्या जीवावरी

पक्ष बदल सुरू ठेवून
स्वार्थासाठी धावत असतात
आमिष दाखवले पदाचे
तिकडेच ते मग धावतात

धुंदी सत्तेची जेव्हा चढते
राजकारण्यांचा भरतोबाजार
काळा पैसा पांढरा करून
देतात मग जनतेवर भार

नसते त्यांना निवृत्ती पदाची
म्हातारपणात मांडतात डाव
नाही होत जन सेवा तरी
चाकारमान्यांवर मारतात ताव

निवृत्तीच्या घोषणा करतात
बालेकिल्ला यांच्याच हातात
रिक्त जागा भरण्यासाठी
घराणेशाहीलाच आणतात

सत्ता आली हातात जेव्हा
खुर्ची असते त्यांची अढळ
मस्त धुंद होऊन जगतात
ठोकून बसतात तिथेच तळ

*सौ रेखा सोनारे*
ता. जिल्हा. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

निर्णायक मत जरी असले मतदारांच्या हातात
तरी सत्तेपुढे शहाणपण त्यांचे चालत नाही अजिबात

लोकांचे राज्य,नावाला असते तिथे लोकशाही
सातत्याने इ थे पुजली जाते घराणेशाही

पवित्र, प्रभावी,अस्त्र नि शास्त्र हेच असते मतदान
परि सत्तेवाल्यांच्या मार्गदर्शनानेच होतो देश महान

सत्तेची धुंदी त्यांच्या नसानसात असते भिनलेली
यास्तव उडवतात ते सर्वसामान्य जनतेची खिल्ली

समता, न्याय,बंधुत्व यांना खिशात घेऊन फिरतात नेहमी
बेकारी,भ्रष्टाचार,दहशतवाद ही यांच्यासाठी नामी संधी

गरिबांची स्वप्न चिरडून टाकतात राजकारणाच्या गजकारणात
सत्तेची धुंदी यांची अडथळा आणते देशाच्या विकासात

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

राजनिती खेळुन पाहू
पक्षात राहू सत्तेत राहू
प्रचंड मताधिक्याने
आम्ही निवडून येऊ !!

राजीनामा मागे घेतला
भाकरीचा चंद्र फुलला
धुंदी सत्तेची मोह पदाचा
खुर्ची कसी सोडून देऊ !!

बारामती बालेकिल्ला
मतदान करी घडयाळीला
बहुमतांनी आघाडीवर
स्थापूया स्थिर सरकार !!

लाट हवा असे एकवेळ
पाच वर्षाचा कार्यकाळ
राजयोग सत्तेत येण्याचा
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ !!

धुंदी सत्तेची चढली रे
सुत्रे विस्तार व्यापली रे
राहवेना मला सत्तेविना
का मी संन्यास घेऊ !!

राष्ट्रीय एकात्मता समता
बाधित करू नका बंधूता
डावेपेचाचे आराखडे न आखता
सत्ताधाऱ्यांनो देश वैभवी चढवू !!

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

धुंदी सत्तेची
नाही हो बरी
स्वाभिमानाची
भाकरी खरी

धुंदी सत्तेची
पैसा अमाप
बेईमानीला
नसते माप

धुंदी सत्तेची
दीनांना भार
प्रामाणिकता
घेते माघार

धुंदी सत्तेची
दडपशाही
चाले सर्वत्र
हुकूमशाही

धुंदी सत्तेची
तो भ्रष्टाचार
दिसत नसे
हा शिष्टाचार

धुंदी सत्तेची
नाही टिकली
भल्याभल्यांनी
सत्ता विकली

धुंदी सत्तेची
देशाची हानी
युद्धाची साथ
नी मनमानी

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles