
“त्रिवेणीत काव्यवेणी गुंफतांना….!”
*’🚩मराठीचे शिलेदार’ त्रिवेणी समूहातील सर्व सहभागी सदस्यांचे अभिनंदन. आपण माहिती करून घेऊया. त्रिवेणी म्हणजे तीन ओळींचे काव्य असा सरळ साधा अर्थ आहे. प्रसिद्ध गीतकार, कवी गुलजार यांनी हा काव्य प्रकार विकसित केला. याला आपण तीन ओळींची कविता किंवा अल्पाक्षरी काव्य असेही म्हणू शकतो.*
*ज्येष्ठ कवी गुलजार यांचे पुढील त्रिवेणी काव्य आपणासाठी अवलोकनार्थ. हिंदी भाषेत त्यांनी ही रचना केलेली आहे*
*कल खुशी मिली थी*
*जल्दी में थी*
*रूकी नहीं |*
*🔹बदलत्या काळानुसार आलेल्या परिस्थितीवर भाष्य करणारी ही त्रिवेणी आहे. त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो. जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो. पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिके सारखी स्पर्श करते आणि त्याचा संपूर्ण विषय बदलून टाकते. अशाच काही त्रिवेणी प्रक्रातील काव्यरचना येथे आपणा सर्व सारस्वतांसाठी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.*
*🪻त्रिवेणी काव्यप्रकारातील निवडक रचना*
🔹
तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय
🔹
इथे कुणी गुलझार ,
इथे कुणी ग्रेस,
मलाच मीपणा नडतोय
🔹
रडताना पहिलीय माय रात्रभर
बाप बरबाद होताना पाहिलाय
कुणी कविता करायला शिकवाल?
🔹
अधीर मातीवरी कोसळल्या पावसाच्या सरी
मृदगंध तो भावनांचा पसरला हवेवरी
जाताना ती कविता मात्र ठेवून गेली
🔹
पर्वा नव्हती पाय किती लांब चालले
पर्वा नव्हती मागे काय सोडून आलोय
शेवटी दिसलीच विठोबा माऊली मला
🔹
खूप मन लागलं होत
खूप काही कळत होत
पण मधली सुट्टी झाली
🔹
रुसलीय ती मी गजल लिहितोय तर
बोलत नाहीय ती त्रिवेणी गुंफतोय तर
माझ माझ्या कवितेशी भांडण झालयं
🔹
तस खूप कामाच होत ते
परत वापरायचा विचारही होता
पण ते भंगार मी विकून टाकलं
🔹
मस्त तुझ्या हातात हात घालून
सांजेला समुद्रकिनारी फिरत होतो
उगाच आईने लाथ घालून उठवलं
🔹
तिने मला काल कॉफीसाठी ऑफर दिली
पण आमची पाहिलीच डेट रद्द झाली
तिची मैत्रीण म्हणे चहा प्यायला जाऊया का?
*🚩आपण ‘मराठीचे शिलेदार’ समूहात सहभागी झाल्याचा आनंद मोठा असल्याचे कारण म्हणजे आपणास हा काव्यप्रकार माहित असून आपण सर्वच कमी अधिक प्रमाणात लिहतो, वापरतो, जतन ठेवतो. आता मराठीचे शिलेदार समूहात या प्रकाराछ नियमित लिखाण केल्यास शिलेदार प्रशासनास संकलनही करता येईल. आपल्या रचना या पुसल्या जाणार नाही. त्याचा प्रसार व प्रचार हा मराठी भाषेची महत्ती वाढविण्यासाठी नक्कीच होईल अशी मला आशा वाटते.*
*🙏आता महत्वाची बाब म्हणजे, या त्रिवेणी काव्य प्रकारात हायकू प्रमाणे अक्षरसंख्येचे बंधन नाही. फक्त काव्य तीन ओळींचे हवे.वरील दोन ओळी एकमेकीला पूरक व तिसरी ओळ वरील दोन्ही ओळींच्या अर्थाला किंचित स्पर्श करणारी असावी. तसेच पहिल्या व दुसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळींचे यमक जुळलेले असावे. याशिवाय या प्रकारातील आणखी काही नियम असतीलच अथवा बंधने त्याविषयी मुख्य प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक नियमित मार्गदर्शन करतीलच. तूर्तास आपण जसे जमेल तसे किंवा पूर्वी आपण लिहलेल्या त्रिवेणी प्रकारातील रचना समूहात प्रसारित करू शकता. लवकरच ‘त्रिवेणी’ समूहाच्या प्रशासनाद्वारे दैनिक विषय देणे, संकलन करणे, स्पर्धा घेणे, सर्वोत्कृष्ट त्रिवेणी निवडून पोस्टर करणे याबाबत मुख्य प्रशासक व सहप्रशासक निर्णय घेतील. आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. तूर्तास ऐवढेच…!!*
➿➿➿➿🪻🔹🪻➿➿➿➿
*सौ. वृंदाताई करमरकर, सांगली*
मार्गदर्शक/कवयित्री/परीक्षक
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪻🔹🪻➿➿➿➿