प्रेरणास्थान

प्रेरणास्थान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जीवनातील प्रेरणास्थान
पहा आहेत माझे गुरू
त्यांच्या आशीर्वादाने
माझा मार्ग होई सुरू||१||

शाळेत असताना दिली
मोलाची अशी शिकवण
जीवनातील विचारांची
करुन दिली जडणघडण||२||

पाठ्यपुस्तकातील धड्यांचा
केला जीवनी संगम असा
प्रत्येकाच्या मनामध्ये
जपला शिक्षणाचा वसा||३||

झाले सारे विद्यार्थी मोठे
लाभले तुमचे मार्गदर्शन
जीवनातील येणाऱ्या
संकटांचे करुन दिले दर्शन||४||

संकटांशी लढण्याची
ताकद तुमच्यामुळे मिळाली
भरकटलेल्या जीवनाची
दिशा मजला कळाली||५||

जीवनातील प्रेरणास्थान
आपले अनमोल शिक्षक
आमच्या उज्वल भविष्याचे
असती सदैव संरक्षक||६||

विनायक कृष्णराव पाटील बेळगाव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles