
मृगसरी
वैशाखी दाह उरी
नभ आले भरून
जसे उन्हाळ्याचे दिस
मेघ जातील विरुन
काळ्या कुट्ट मेघांनी
दिला इशारा आता
सावध हो बळीराजा
मृग सरींच्या स्वागता
मृगसरी झरझर पडती
तरारली गवताची पाती
पानावर चमकले दव बिंदू
राने वने ओलेचिंब होती
धरतीला फुटला अंकुर
बीज रुजली नभ प्रितीची
पिके लागली डोलायला
आनंद झाला भव्य रुपाची
आकाश आले भरून
रान झाले ओले चिंब
रान होईल हिरवेगार
दिसेल शेतकऱ्याच प्रतिबिंब
बळीराजाची शेती पिकली
पोशिंद्याची ओंजळ भरली
सुगीचे दिवस आले दारी
संसाराची भ्रात ही मिटली
कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर
==