बेधुंद व्हायची प्रतीक्षा संपली येत्या शुक्रवारी “दिल बेधुंद ” प्रदर्शित होणार

बेधुंद व्हायची प्रतीक्षा संपली येत्या शुक्रवारी “दिल बेधुंद ” प्रदर्शित होणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_ओशियन कव्हर्ज एंटरटेनमेंट प्रस्तुत “दिल बेधुंद” 19 मे रोजी प्रदर्शित_

नागपूर: आगामी चित्रपट “दिल बेधुंद ” या चित्रपटाची कथा लेखन गुड्डू देवांगन यांनी लिहिली असून हा चित्रपट शुक्रवार दि. 19 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी संगीतकार स्वप्निल शिवणकर आणि सर्व कलाकारांनी या चित्रपटाविषयी पत्रपरिषदेत माहीती दिली. हा चित्रपट प्रेमकथा यावर आधारित आहे.

चित्रपटाची निर्माते शिवम पाटील चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष फुडें, गुड्डू देवांगण यांची कथा लेखन आणि चित्रपटाचे डीओपी असे आहेत. या चित्रपटात जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोंनी मिश्रा, धीरज तरुणे, गोविंद चौरसिया, संतोष सारवा आणि चिरंजीव सिंग यांचाही या चित्रपटात भूमिका आहे. चित्रपटाचे संगीतकार स्वप्नील शिवणकर यांनी पत्रकारांना येत्या शुक्रवारी दिल बेधुंद चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती यावेळी दिली.

या चित्रपटात प्रेमकथा म्हटलं की साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचा एक कथानक नायक नायिका भावना उंचबळून आणनारं संगीत आणि अत्यंत प्रेमळ वाटणारे संवाद असा सगळा मसाला आधीच तयार होतो मग प्रेक्षक हा सगळा मसाला डोक्यात घेऊन चित्रपटगृहात जातात, अरे हे तर आधीच माहीत होतं असं म्हणतात आणि परत येतात. प्रेम कथेवर आधारित तयार होणारे त्याच त्याच धाटणीचे चित्रपटही त्याला काही अंशी करणीभूत असतात पण अर्थात सगळे चित्रपट असे एकाच मुशीतून काढलेले नसतात, बरं का ! अशीच एका वेगळ्या प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी “दिल बेधुंद ” सज्ज झाला आहे.या चित्रपटात संगीतकार स्वप्नील शिवणकर यांनी गाणं गायलं, कंपोज सुद्धा केलेलं आहे, गाण्याची धुंद पण दिली आहे, गाण्याचे नाव आहे – मस्तीच्या बंदुकीतील बुलेट आम्ही करू ? कृपया प्रेक्षकांनी “दिल बेधुंद ” चित्रपट बघण्याचा आनंद घ्या विसरु नका परत अशी वेळ येणार नाही. असे आवाहन केले आहे.

पत्रपरिषदेत आरती कुथे, संयोनी मिश्रा, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, चिरंजीव सिंग, स्वप्निल शिवणकर, (संगीतकार) डॉ. निल इंगळे (नायक) स्वप्निल भोंगाडे यावेळी मंचावरील उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles