हाॅलंड..Tulip Garden….

हाॅलंड..Tulip Garden….



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हाॅलंड मधील फुले पाहताना
मी फुलांकडे पाहतच राहिले
रंगीबेरंगी ही निसर्ग किमया
डोळ्यात, मनात साठवू लागले….

सावकाश हळूवार हात लावला
या लाल,पिवळ्या,केशरी फुलांना
सुवास या सुमनांचा अंतरात
साठवून ठेवला कळी फुलून पाहताना….

सुरेख रंगसंगती या सृष्टीची
पाकळी ती मोहक सुमनांची
आकार पुष्पांचे निरखताना
उधळण होते इंद्रधनुष्याची…..

वार्‍यावर ही सुमने डोलताना
सृष्टीशी हितगुज करिती जसे
आतून प्रफुल्लीत होती सुमने
धरणीला भेटण्या आतूर असे….

ट्युलीप फुलांचा मंद,धुंद सुगंध
आसमंती दाही दिशा दरवळू लागे
पाकळी पाकळी उमलताना
मी फुलले ,मी फुलले सर्वांस सांगे…

गार्डनला भेट देताना नजर ठरत नाही
अनेक रंगी फुले पाहून वसुधा खुलली
सृष्टीच्या हा अनमोल खजिना देखणा
वसुधेवर फुले फार शोभूनच दिसली…

वसुधा नाईक,पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles