बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : स्नेहवलय🥀*
*🍂बुधवार : १७ / मे /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*स्नेहवलय*

मैत्री जुळली तुझ्याशी
क्षण आनंदाचा आला
खचलेल्या या मनाला
तुझा आधार मिळाला ||१||

दिला आधार मनाला
साथ कधी न सोडली
माझ्या हळव्या मनात
वीण नात्याची जोडली ||२||

आठवांच्या सोबतीने
जगे असा दिनरात
माझ्या खांद्यावरी असे
तुझ्या मैत्रीचाच हात ||३||

आहे खूप अनमोल
तुझी माझी जोडी खास
मैत्री सुंदर आपली
एकदम हो झकास ||४||

असे मैत्रीचे बंधन
सदा रहावे सुंदर
येवो कितीही संकटे
कधी न येवो अंतर ||५||

मागे वळून पाहता
राहतसी आठवणी
अशा सदैव जपल्या
मनामध्ये साठवणी ||६||

तुझ्यावरी आहे मित्रा
माझा संपूर्ण विश्वास
अनमोल या नात्याचा
मैत्री असे खरा श्वास ||७||

असे हे बंध मैत्रीचे
त्याला असती वलय
असे राहो अबाधित
सुंदरसे स्नेहवलय ||८||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

मानवसेवा हिच खरी
ईश्वरसेवा मानुनी
माणुसकीचे स्नेहवलय
निर्मिले बाबा आमटेंनी

समाजसेवेचे व्रत घेऊनी
झोकून दिले या कार्याला
स्वतःच्या विलासी जीवनाचा
समाजकार्यासाठी त्याग केला

कुष्ठमुक्त करूनी दिली
उभारी त्यांच्या मनाला
माणुसकीचे प्रेम देऊन
दिला आधार जीवनाला

दिव्यांग,अनाथांच्या आयुष्यात
दिला नव्या आशेचा किरण
स्वकर्तृत्वाने मार्गी लावले
त्यांचे निराशमयी जीवन

मानवतेचा अखंड झरा
वाहतो आमटे परिवारात
माणुसकीचे हे स्नेहवलय
पिढ्यानपिढ्या जपत आहेत

*सौ.प्रांजली जोशी, विरार,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*स्नेहवलय*

पुरे झालाय मानवांनो
हे वादविवादांचे प्रलय
सारे मिळून उभारूया
भोवताली स्नेहवलय

माणसाळलेल्या जगी
क्षणोक्षणी गुंतून रहावंं
सहवासाच्या धाग्यांनी
घर काळजीचं विणावं

अल्पसं आयुष्य सुंदर
जगून घ्यावं भरभरून
हास्यानी घर सजवावं
भांडणतंटे दूर सारून

काय हवं स्वतःला तेच
निस्वार्थ द्यावं इतरांना
मन:कुपीत सांभाळावं
नाजुक या भावनांना

शब्द वापरावेत जपून
अन् करावा परोपकार
गंध शिंपडूनी प्रेमाचा
नात्यांस द्यावा आकार

कधी मागावी माफी
कधी रागवावं हक्कानं
स्नेह बीज हे रूजवून
लिहावं जीवन गाणं

*मीता नानवटकर नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

प्राणी समाजशील माणूस आहे
एकटा तो जगू शकत नाही,
स्नेहवलय त्याच्या सदैव सोबती
त्याच्या शिवाय तो आनंदी नाही.

सुख समाधानाचीं चंगळ
अन श्रीमंतीचा ऐशआराम
माणसाला कितीही असला तरीही
हवा आहे मायेचा मलम.

आनंदाचा मुक्काम
येतो का सहजासहजी?
त्याग अन समर्पणाने
घ्यावी लागते काळजी.

नारळाचे हवे ज्यांना
शीतल गोड पाणी,
गुण त्यांचे जाणून घेऊ
लपवू डोळ्यातील पाणी.

कठोर ह्यावे प्रसंगी
पाषाणा प्रमाणे आम्ही,
स्नेहवलयासोबत राहून
जिंकू दिशा आम्ही दाही.

असावे घर असें प्रेमळ
ममतेने व्हावी विचार पूस,
शांती अन समाधानाचा
वावर असावा आसपास.

*मायादेवी गायकवाड*
मानवत, परभणी
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

पाच वर्षातील सेवेच्या,
आज तरळल्या आठवणी
खरा निरोपची आज घेता,
नयनी आले पाणी ||१||

आदर्शग्राम संस्कारी नागरिक,
मदतीस हजर तत्क्षणी
स्वच्छ सुंदर शाळा बनली,
परिपूर्ण भौतिक सुविधांनी ||२||

टुमदार गावची सान शाळा,
सजविली विविध उपक्रमांनी,
गुणवत्तेतही कमीच नाही,
दाखविले गोजिर्या पाखरांनी||३||

स्नेहवलय निर्माण झाले,
समकक्ष विचारांनी
सहकार्य,जिव्हाळा, प्रामाणिकता,
सर्वांच्याच आचरणी ||४||

*सौ. शारदा राहुल शिंदे*
वाई, सातारा
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

सुरेख विचारांचे मनोरे रचले
खोल खोल हृदया अंतरी प्रीतीचे
होता मिलन मनाशी मनाचे
जुळले अनुबंध प्रीत रेशमाचे…

सख्या तुझ्या मनाचा ठाव घेता
कस्तुरी सुगंध चौफेर पसरला
जणू मधुकणांचा प्रेमळ मकरंद
चाखून प्रीत वारा मला उमजला …

प्रेमाच्या झुल्यात झुलले मस्त
प्रीत मोरपिसारा स्नेहवलय फुलवी
तूच माझा सखा सोबती या संसारी
स्वप्नवत दुनिया माझी तू सुरेख सजवी.

स्नेह दिला घेतला संसारी एकमेका
परिवाराची साथही उत्तम मिळाली
जपूया नात्यातील हा गोडवा अवीट
दोघांची जोडी जीवनात आनंदे रमली….

*वसुधा नाईक, पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

जेथे विराम पावतो
हर वादाचा प्रलय
तिथे उगम पावतो
अपार स्नेहवलय.. //

रंगी बेरंगी सुमने
जशी माळेत गुंफावी
वेग वेगळी माणसे
तशी मनात गुंतावी.. //

राव रंक सर्वाप्रती
दृष्टी समान ठेवावी
मना मनात प्रेमाची
ज्योत अखंड तेवावी.. //

इथे सारे घेणे देणे
रिक्त हस्ते येणे जाणे
कर्म धर्म सर्व श्रेष्ठ
नको व्यर्थ ताणे बाणे… //

दोन घडीचा पाहुणा
देह केलासी धारण
उद्या हलेल मुक्काम
सत्य शोधावे कारण… //

कांही मरून जगती
कोणी जगून मरती
ज्याचे त्याने ठरवावे
व्हावी कशात गणती…//

विस्तारावे स्नेहवलय
हाती असे संधी नामी
देह व्हावा देवालय
जन्म लागो याच कामी.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

आयुष्य कसं केविलवान झालंय
चारही बाजूनी संकटाने घेरलंय
धाडस करून पाऊल पुढे टाकलंय
त्यातही आपल्यांनीच मागे खेचलंय

नको झालंय असं आयुष्य
मुळीच नको वाटती ही वेळ
इथ समोरच्याच चांगल करताना
मनात असावा लागतो स्नेहवलय

मी सर्वांना माझं माझं करत
हाती खूप काही जमवलं होत
माझा सर्व आंनद सर्व माझ सुखं
इतरांच्या डोळ्यांत खुपत होत

जशाच तसं वागणं हे मला
कधी आयुष्यात जमलं नाही
लोकांनी घेतला इतका फायदा
हाती आता काहीच उरलं नाही

विश्वास आपल्या वरच ठेवावा
असं अनेकदा ऐकलं होत
एकदा ठेऊन बघावं विश्वास
असं मनानं काही ठरवलं होत

ठेवला विश्वास आपल्या माणसांवर
पण ठेस अशी जीवा लागली
आपली माणसं आपली नाही
ही गोष्ट मात्र पक्की पटली

कुठल्याही गोष्टीची अपूर्णता
भासल्यावरच मोल कळतं
निघून जात आयुष्य पुर्णता
स्नेहवलय आपल आधार शोधतं…

*श्रीमती वर्षा मोटे*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

आपुलकी विणतसे जाळ
नात्या -संबंधाच स्नेहवलय
निर्माण सुंदरते प्रेमालय…॥

स्नेह वाढवी ममता
वात्सलेचा हृदयी जिव्हाळा
हित जोपासते लेकुरवाळा…॥

कौटुंबिक सामाजिक बांधिलकी
जोडणारा एकोप्याचा सांकव
तुटेना कितीही वाकव…॥

ओढ असते माहेरवासिनिला
माहेरच्या आठवणीत रहावेसे
उन्हाळी पाहुणपणा जावेसे…॥

परीसर विश्वाशी संपर्क
स्नेहवलयी केंद्र आजोळात
वाटते रमणीय गोकुळात…॥

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💜🩷➿➿➿➿
*स्नेहवलय*

काव्य गुंफता गुंफता
काव्यांगणी मी रमलो
स्नेहवलय पाहता इथे
मनानेच भरून पावलो

मराठीचे शिलेदार समूह
लाभले मज कुटुंबासम
ऋणानुबंध स्नेहरूपी
जुळले असे अधिकतम

प्रेरणा,प्रशंसेला नसे
इथे कदापिही तुटवडा
शब्दसुमनांचा पडतो
समुहात नेहमीच सडा

कवी दादा व कवयित्री ताई
असती काव्यप्रतिभा संपन्न
काव्य प्रतिक्रिया ऐकताना
मन मयुर होते अति प्रसन्न

मुख्य प्रशासक राहूल दादांनी
बांधला काव्य सेतू भरभक्कम
स्नेहवलय पाहता अनुभवताना
ओसरती नेत्रांजनी जलतरंग…

*दत्ता काजळे, ‘ज्ञानाग्रज’*
*उमरगा जि.उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles