‘माय कलेक्शन’चे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते उदघाटन

‘माय कलेक्शन’चे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते उदघाटन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आंतराष्ट्रीय संग्रहालय दिन उत्साहात_

वसुधा नाईक प्रतिनिधी

गोवा:आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद,संस्कृति मंत्रालय,गोवा विज्ञान केंद्रातर्फे 16 ते 18 मे
3 दिवसांचे दुर्मिळ वस्तूंचे , ‘माय कलेक्शन ‘ हे प्रदर्शन
भरवण्यात आले.

यात 13 संग्राहक सहभागी झाले .सदर प्रदर्शनाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे हस्ताक्षर मनोविश्लेषण संग्राहक , हॅन्डरायटिंग ॲनॅलिसिस रिसर्च फौंडेशनचे (हार्फ) संस्थापक, अध्यक्ष आणि विश्वविक्रमवीर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.रुपेशकुमार तसेच हार्फ संस्थेच्या सचिव सौ.मेघना घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षस्थानी
गोवा विज्ञान केन्द्राचे परियोजना समन्वयक श्री.विलास चौधरी होते.
दुर्मिळ वस्तुंच्या संग्रहासाठी नवोदित
संग्रहाकांनी आपला छंद सातत्याने जतन करावा असे अध्यक्षीय भाषणात श्री.चौधरी यांनी सांगितले.

दुर्मिळ वस्तुंच्या संग्रहाच्या माध्यमातून संग्राहक भारतीय संस्कृतीचे संवर्धन करीत असल्याबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सर्व संग्रहाकांचे हार्दिक अभिनंदन केले. या प्रदर्शनात शिवनाथ जुवरकर, स्वरुप शानबाग , डाॅ.फिरोज बडेसाब , रॉबिन स्करिथ, कबीर युनुस, नीला भंडारे , विनायक शानबाग आदि संग्राहक सहभागी झाले . नाणी, काडेपेटी, पोस्टल स्टॅम्पस् , चाॅकलेट रॅपर्स, जुने कॅमेरे , ग्रामोफोन अशा विविध दुर्मिळ वस्तु प्रदर्शनास रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles