लाटांच्या वाटा
दिसत नाही कुठे
त्या लाटांच्या वाटा
समुद्रही घाबरतोय
जेव्हा पडतोय चाटा
कुठे अन् कधीही
कायमस्वरूपी लाटा
अस्तित्वात नसती
पण असतो बोभाटा
यावे कुठे नि जावे
नसते घळीचा भरोसा
क्षणार्धात उसळती
नसतो कुणा कानोसा
वेळोवळी कळतंय
अस्तित्व त्या हवेचा
दिशाहिन असला जरी
कुणा लागते कानोसा
दाही दिशा मधुनी
उसळती लाटांच्या वाटा
हवेचा दाब ठरवतो
प्रत्येक खेळ नशिबाचा
चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
जि.गोंदिया
=======