‘कोराडीतील ऊर्जा निर्मिती प्रकल्प नांदगाव -बखारी इथे सुरू करावा’; विदर्भ शेतकरी संघटना

‘कोराडीतील ऊर्जा निर्मिती प्रकल्प नांदगाव -बखारी इथे सुरू करावा’; विदर्भ शेतकरी संघटना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथे सध्या सुरू असलेल्या पाॅवर प्लांटच्या लगत असलेल्या ठिकाणी नवीन 660×2 इतके क्षमतेचे सुपर क्रिटिकल ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे.

कोराडी- खापरखेडा इथे राज्यातील प्रमुख दोन ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू आहेत. कोराडी- खापरखेडा क्षेत्र नागपूर शहराला अगदी लागून असून सुद्धा नवीन प्रकल्प इथे सुरू करण्याचा प्रस्ताव का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
सरकारने हा प्रकल्प कोराडी इथे न करता पारशिवनी तालुक्यातील नांदगाव -बखारी इथे सुरू करावा याचे सरकारला व जनतेला सुध्दा फायदे होऊ शकते.

एक नंबर प्रकल्पासाठी एकही इंच जमीन खरेदी करण्याची गरज नाही कारण तिथे आदीच mseb ची 750 एकर जमीन फुकट पडून आहे.

दोन नंबर या प्रकल्पासाठी लागणारा कोळश्यावर लागणारा वाहतूक खर्च कमी लागेल कारण कोळसा खाण लागूनच आहे. तीन नंबर पाणी पण जवळ उपलब्ध आहे आणि सर्वात ऊर्जा निर्मितीतून निघणाऱ्या राखळी साठी तलाव निर्माण करण्याची गरज नाही कारण या 750 एकर जमीनीमध्ये आदीच अंश पोंड तयार करून ठेवला आहे.
या नांदगाव -बखारी जागेपासून हायवे रेल्वे, नदी, कोळसा खाण अगदी जवळजवळ आहेत.

सरकारने जर हा प्रकल्प नांदगाव -बखारी इथे सुरू केल्यास तर कन्हान, पारशिवनी आणि रामटेक भागातील गेल्या काही वर्षां पासून रखडलेला विकास काही प्रमाणात भरुन निघेल. या क्षेत्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार नवीन संधी निर्माण होईल.

विदर्भ शेतकरी संघटनेच्या वतीने व संजय सत्येकार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles