
रेशीमगाठी
रेशमी किनारे सुखाचेे
बोलु लागले सारे
अमृताच्या क्षणास आतुर
बेभान झाले वारे||१||
स्वप्न पाहता आनंदाचे
अंगणी सजले तारे
दवबिंदुच्या थेंबाथेंबातुन
फुलले मोहक मोरपिसारे||२||
सप्तपदीच्या रेशीमगाठी सजता
जीवन स्पर्शिका फुलली सख्या रे
तुझ्या प्रीतीच्या पाऊलखुणा
देती सौभाग्यसुख हासरे||३||
सौ.उर्मी( हेमश्री) घरत,पालघर
====