
रमणीय नगरी शब्दांची…!
शब्दांच्या नगरीत
नकळतच टाकले पाऊल
वाट होती अक्षरांची
अनामिक साथीची चाहूल ||१||
मनातील भावनांना
व्यक्त होण्याची संधी
अव्यक्त अबोल मन
राहत नाही इथे बंधी ||२||
रमणीय आहे खरं
शब्दांच्या नगरीत जगणं
जग असे विलक्षण
वास्तवापलीकडे बघणं ||३||
शब्दांच्या नगरीत
हरवतो एकटेपणा
विचारांच्या नगरीत
भावनांचा आपलेपणा ||४||
नगरी येता शब्दांच्या
जन्म होतो कवीचा
दृढ होते हे नाते
अतुट धागा मनीचा ||५||
श्वेता मिलिंद देशपांडे
जामनगर, गुजरात.
======