
आठवणी
अगणित आठवणी
मनात घर करतात
हुरहूर लावतात
या सांजवेळी..
हसलेल्या रडलेल्या
अंतर्मुख मनाशी
सुखावलेल्या जराशी
अविस्मरणीय..
आठवणींची पाने
उलगडते अधूनमधून
मनात दाटून
येती भावना..
हृदयात पहुडलेल्या
काही हळव्या भावनांचा
मोहरल्या क्षणांचा
गाठला तळ..
एकटेपणाच्या वळणावरती
हक्काने राज करतात
अनुभूती जागवतात
प्रत्येकवेळी..
हृदय आभाळी
अश्रू डोळ्यातून ओघळती
किती छळती
गोड आठवणी..
सारिका डी गेडाम, चंद्रपूर
======