
होरपळ
पाशवी मानवी विकृतीला
आळा कुणी घालेल का?
माझ्यासारख्या निर्भयांची
सुटका कुणी करील का?
प्रश्न विचारतेय अंतर्मनातून मी
समस्त पुरुषी अहंकाराला
प्रेम, संसार, नि अनेक कारणांसाठी
कां होरपळताय ? नारी जातीला
कळतेय न तुम्हालाही की तुमचं
सृष्टीवरील अधिपत्य नारीच्याच हाती
फक्त उपभोगाची वस्तू समजून
कां करताय? तुमच्याच पिढ्यांची माती
नाबालिक, प्रौढ, संत नि राजकारणीही
कां घेतात माझ्या निर्बलतेचा फायदा
तुम्हांला सृष्टीवरच आणायचं नाही
करू कां मी स्वत:शीच वायदा
पण स्त्री जातीचं मन तेवढं
पुरुष जाती एवढं निष्ठूर नाही रे
ती जपते नित्य आपल्या शीलाला
या सृष्टीचक्र निर्माणासाठी रे
तुमच्या दिलेल्या यातनांनी
कितीदा सावरावे नारीनेच रे
तुझ्या वासनेच्या क्रूर नजरेने
होरपळतेय मी भवसागरात रे….
होरपळतेय मी भवसागरात रे…..
हंसराज खोब्रागडे
अर्जुनी/ मोर, गोंदिया