धुंद..

धुंदपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रवाहाच्या विरुध्द दिशेने
वाहवत जाण तुझं
प्रवाहात आणता आणता
साहावत रहाण माझं…..
केविलवाणी धडपड
उधाणलेला सागर थोपवायची
अचानक उसळलेल्या लाटांनी
परत तू मार्ग बदलायची…..
सहनशक्तीचा होतो अंत
तरीही तुझ वाहण निरंतर
बस झालं आता तुला झेलन
वाढतच जाणार आहे अंतर
हे चार दोन क्षणच
संधी देतील सावरायची
मनाचा सुटलेला लगाम
क्षणार्धात आवरायची..‌‌.
पण माजलेल्या मुजोर मनानी
तू करत जाणार मनमानी
आणि तोंडघशी पडल्याची
खबर लवकरच येईल कानी
परतीचे सर्व मार्गच तेव्हा
चहुकडून असतील बंद
पश्चातापात होरपळशील
तेव्हाच उतरेल तुझी धुंद
तेव्हाच उतरेल तुझी धुंद…..

अरविंद उरकुडे, गडचिरोली
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles