बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*घुसमट….*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बंद केली मनाची कवाडे,
घुसमट होते वेड्या जीवाची
तुटलेले मन तुकड्यात वेचताना
उगाच तगमग चालली श्वासांची.

*सौ.सविता वामन ठाणे.*
सदस्या कवियत्री लेखिका.
*©मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*चारोळी_घुसमट*

बोलू शकत नाही
हृदयी झेलते वार
घुसमट मनाची होई
कधी होईल नौका पार

*सौ.शशी मदनकर,ब्रम्हपुरी*
*©सदस्या_मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

आई ओळखे बाळाची घुसमट
आईचे मन भारी जादुई
मोकळी करते क्षणात वाट
करून मनाची दिलजमाई ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*घुसमट*

लग्न करून सासरी जाताना
नव्या नवरीची होते घुसमट,
आईबाबांचे वाचवतील संस्कार
होऊ देवू नयेत त्यांना पुसट.

*मायादेवी गायकवाड*
मानवत परभणी
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

सदा न कदा होते स्त्रीची घुसमट
कधी आफीस,कधी घर
जगावे लागते मन मारुन
सुरु असते सर्वांची कुरकुर

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

कळली मज आई ,.
जेव्हा झाले मी आई,.
तिचे काळीज, तिची घुसमट
करी मुलांचे शब्द कुचपट||.

*सौ उर्मिला गजाननराव राऊत,*
*फ्रेंड्स कॉलनी, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट…….*

आयुष्यभर सहन करून घुसमट,
दिला कुंदुंबास आकार,…
वंदन करतो माऊली माझी,
तुझा त्रिवार जयजयकार….

*सचिन शरदराव जोशी*
मुर्तिजापूर जि. अकोला…
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

कुणाशी भावना व्यक्त न करता
असते जीवनाची घुसमट सुरू
ज्यानी सुचविला उपाय तोडगा
तोच आपला या प्रसंगी गुरू

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपुर*
*©सदस्या मराठी चे शिलदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

घाम गाळून पिक घेतो शेतकरी
पण मालाला जराही भाव नाही
मनाची घुसमट होते पोशिंद्याची
तरी शासनाला जाग येत नाही

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

संकटाशी दोन हात करत
विजयश्री मिळते तेव्हां
घुसमट व्हायला लागते मनी
शमलेले वादळ पेटते जेव्हां

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles