बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*घुसमट*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

घुसमट होते हो जीवाची
पण कुणा नसे पर्वा त्याची …धृ

मी नी माझा संसार
यातच सारे व्यस्त
वृद्धाश्रमात आईबाप
होऊन पडलेत सुस्त
तमा न राहिली कर्तव्याची
पाहून दशा जाणीव शून्यतेची
घुसमट होते हो जीवाची
पण कुणा नसे पर्वा त्याची …१

गल्लोगल्ली तरुण फिरती
बेकारीची कुऱ्हाड मानेवरती
बुद्धिमत्ता व्यसनात गुंतली
मनुष्यबळाची क्षती झाली
लाही लाही होते अंतरीची
पाहून हतबलता तारुण्याची
घुसमट होते हो जीवाची
पण कुणा नसे पर्वा त्याची …२

अंदाधुंदी सगळीकडे
पहा कशी हो माजली
निरंकुश बेबंदशाहीत
कुणी कुणाचा ना वाली
स्वार्थाने सारीच पछाडली
पाहून हत्या होते मनाची
घुसमट होते हो जीवाची
पण कुणा नसे पर्वा त्याची …3

मूल्यांची इथे होते रोजच होळी
जो तो भाजतो आपलीच पोळी
नितीमत्तेला मुठमाती मिळाली
मानवता जपण्या उरला ना वाली
कशी होईल राखण संस्कृतीची
कल्पना करुनी भविष्याची
घुसमट होते हो जीवाची
पण कुणा पर्वा नसे त्याची …४

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

घुसमट मांडली जाते
स्त्रीमनाचीच हृदयस्पर्शी
बाप राब राब राबतो
तरीही चर्चा नसते फारशी

घुसमट बापाची कधी
कळणार नाही कुणालाही
हुंदका दाटूनच मरतो
अंगाची करून लाही लाही

तोंड ताबून बुक्क्यांचा
मार सोसतो तो मुकाट्याने
डोंगरासारखा निश्चल तो
डगमगत नाही फुफाट्याने

विस्तवावर सदा चालतो
चटक्यांची पर्वा न करता
सदा पाठिशी उभा राहतो
कोसळूनही अंगी शूरता

रडतो एकांती तोंड दाबून
कोसळू नये म्हणून घरटे
बाप म्हणूनच हिंमत देतो
जन्मले जरी कपाळकरंटे

कष्टाची फळं खुणावता
फरपट ती विसरे क्षणात
घुसमट मनाची न सांगता
मुलांची यशस्वीता जनात

मुलांची यशस्वीता जनात

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

घुसमट होत राहिली क्षणोक्षणी
ऐकून शब्दबंबाळ करणारी वाणी
कोमेजलं मन माझं
आलं नाही कुणाच्या ध्यानी
वाटलं दुखी मनाला माझ्या
मिळेल सहानुभूतीची फुंकर
पण प्रेमाचा अंकुर कधी बहरला नाही
घुसमट मनाची कधी थांबली नाही
मलाही मन आहे
मलाही भावना आहे
अस्तित्व माझं जाणलं नाही कुणी
घुसमट मात्र होत राहिली क्षणोक्षणी
जबाबदारीचे ओझं कधी कमी झालं नाही
घुसमट मनाची कधी थांबली नाही
जगायचं होतं मनसोक्त
नाही कधी होता आलं व्यक्त
खोल जखमा अंतरीच्या
मुलामा कधी भेटला नाही
घुसमट मनाची कधी थांबली नाही
वाटलं होतं स्वैरपणानं नभी उडावं पक्ष्यासारखं
तोडून सारे मोहपाश
आयुष्य जगावं मनासारखं
पण छाटलेल्या पंखांना माझ्या
बळ कधी आलं नाही
घुसमट मनाची कधी थांबली नाही..

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण, सातारा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*घुसमट*

घुसमट मनाची काढ सखे
भाकर प्रेमाची वाढ सखे

काय बोलू मुक्या वेदना मी
नको करु एवढे लाड सखे

यावी स्वप्नात रोज तू माझ्या
म्हणून झोपतो मी गाढ सखे

येतो कंटाळा विरहाचा तुझा गं
टाळणे मज आता तू टाळ सखे

फूल उमलू लागली जाई-जुईचीही
स्वप्नात हसतो आहे आपला बाळ सखे

*इंदुरवार बी.आर*
*किनवट, जि.नांदेड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

चुकीचं आहे दिसतं पण
नाही म्हणतव नाही ठासुन
हो म्हणतेय खोट हसून
अन् घुसमट घेती सोसून

तत्वांच्या विरुद्ध केल म्हणून
कोसत असते मनास
विचारांचं काहूर अधरी
ईजा करत असते तणास

इतरांच्या मन शांतीसाठी
सुख आपल बांधते दावनीला
ईच्छेचा पेठारा कुलुप बंद
चावी नाही तिच्याकडे खोलायला

थोडीशी वाह अन् थोडीशी तारीफ
ईतकेच पुरे तिला जरा खुलायला
एकांती होते जेव्हा ती घरात
स्वतःच लागते ती झुरायला

घुसमट ईतकी मनाची होई
लागते ती चिडचिड करायाला
स्वतःलाच धरते गृहीत सदा
वड्याचा तेल लावते वांग्याला

नाही म्हणावयास शिक तूही
नाही जिथे पटत रूचत
ठाम निर्णय घे तु तुझा
परीणाम दिसेलच सोबत

*सौ रुपाली म्हस्के, मलोडे गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

नववधू लाजते फार
सासरी ती गेल्यावर
नसे कुणाचा आधार
नवखे असते सासर!

जीवओवाळी पतीवर
बोलते कमीच जरूर
वेळोवेळी असे माघार
जुंपलेली ती कामावर!

थकते खूप दिवसभर
नसला मान की आदर
गप्प रहाणे सोयीस्कर
सहन करते उपासमार!

घुसमट मनाचीच फार
दुःख कुणा सांगणार
नवीन माणसं संसार
आईला सांगे थोडंफार!

पती कधी बोलल्यावर
समजावते ती खरोखर
देते वचन नाही चुकणार
तुम्ही सोबत असल्यावर!

या मनाचा करा विचार
नाही खोटं बोलणार
घुमटतो जीव वारंवार
नसेल माझी रे तक्रार!

घाल फुंकर एकदातर
पोळलेल्या या मनावर
घुसमट होईल रे दूर
मला तुझा हवा आधार!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

नात्यामधी सुई दोरा तुरप
सारखी असते रीप रीप
कोण टोचत कोण सांधत
कोण शिवत कोण उसवत..

साध गणित पण टोकाचं
टोकदार टोक टोकाच
आडव तिडव चालायचं
दाबून बसलं बसवायचं…

जीवन फुलावाणी नसून
टवटवीत पण कोमजून
धडगत राहते फसवून
कस राहायचे राबवून….

असचं असत सासा सुनचं
कोण भांडत कुणी गप्पच
सारखी घुसमट जीवनाचं
धाम सदन मात्र कडाक्याचं…

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह…*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

वाटत मलाही कधी
एक स्वप्न बघाव छान
पण त्याच्या पुर्तीआधी
होते त्याची धुळधान….

का असे सदैव व्हावे
माझ्याच नशिबासी
निराळेच खेळ मांडते
नियती ही दर दिवशी….

विस्कटुन सगळे बंध
तुटतात सारे मोहपाश
होवून मग विचार अंध
निराशेने जगते हताश….

नाव जाणत कुणी
भाव हे अंतरीचे
व्यर्थ वाटे जीवन
मनाच्या घुसमटीचे….

कुठवर सोसायची मनाची
जीवघेणी होणारी घुसमट
ह्रदयातच आटून जातात
डोळ्यातील अश्रूंचे पाट….

घुसमट ही जीवास
निराशा ही पदरी आली
कर्तृत्वाची माझ्या इथे
कधीच ना कदर झाली….

*श्रीमती वर्षा मोटे*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह…*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

माझ्या मनाची घुसमट
कशी सांगू रे विठ्ठला
इतका सुंदर देह देऊनि
व्यर्थ तो मी घातला

मतलबी पणाचा सर्व
मांडला मी बस्थान
माझे माझे करता करता
समाजासाठी झालो बेमान

माझं हित साधण्यासाठी
करत होतो तुला प्रार्थना
ज्या समाजात वावरतो
त्यासाठी केली नाही याचना

सुखात नादंत असतांना
झाली नाही तुझी आठवण
संकटाच्या जाळ्यात अडकता
शोधू लागलो मी चरण

अंहकार घे माझा पदरात
फेकतो स्वार्थ मनाची जळमट
मी पणाच्या प्रपंचात आता
सहन होईना ही घुसमट

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

आजकाल असे माझा
वाद विवाद स्वतःशी
मुके सारे माझ्यासाठी
नाही संवाद कोणाशी.. //

मुकी बहिरी माणसे
झाल्या बोथट संवेदना
सोयिस्कर मौन पाळे
कोण जाणेल वेदना… //

भक्त होवू मी कुणाचा
रिक्त असे खिसा आज
कुणी ना करे सलगी
फक्त याचे हेच राज… //

येथे सारेच व्यापले
कैक जणांनी आभाळ
बळ पंखात अमाप
होते. तरीही आबाळ.. //

मागू कुणा रोजगार
शिफारस पत्र नसे
लाज सोडली लाचेने
जरी मी ही पात्र असे.. //

पदोपदी ही वंचना
खंत जाचते बोचरी
हेच फळ का तपाला
हाती भिकेची टोकरी.. //

उच्च शिक्षित दाखले
दखलही घेईचना
कुणी पाहून शिक्षण
हमालीही. देईचना.. //

जीवघेणी घुसमट
छळे अशी अतोनात
मुले अडाणी नेत्यांची
लाखोपती रातोरात.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

घुसमट आज मनाची
मज आता सोसवेना
किती आले पावसाळे
नयन भरता भरेना

दाटला अंतरात जीव
दाह शमता शमेना
श्वास कोंडला आज इथे
शब्द मोकळे निघेना

वाताहात जीवनाची
व्यक्त होत नव्हते मन
जखम मनात चिघळली
होत असह्य आतील व्रण

छाप मनात ठेवताना
कल्लोळ त्या वेदनांचा
नाही केलेस स्वैर त्यांना
फोडुनी त्यास मुक्त वाचा

मनाच्या शांत सागरी
पोहावे तुफानी लाटा संग
अंधार मनीचा झटकूनी
उठवून आनंदाचे तरंग

नको घुसमट मनाची
तोडूनी पाश सर्वांगाचे
स्वैर स्वच्छंदी आकाशात
उडावे पंख फैलुनी आकांक्षाचे

*रेखा सोनारे*
ता. जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

असते मनात विरह ,
वाढते बेचैनी जेंव्हा
घुसमटत असते मन
न कळे काहीच तेंव्हा

नसते साथ कुणाचीही
मदतीला नसतो कुणी
रडगाणे सांगायचे तरी
कुणाला, पडे प्रश्न मनी

वाईट जशी घडी येता
संकटांची रांग लागते
एकामागून एक येती
प्रश्नांची उत्तर मागते !

अशावेळी करावे काय
सुचत नसतेय काही ,
विचारांची घुसमट होई
पण प्रश्न सुटत नाही !

मनी घुसमट होतंय..,
काय करावं कळेना ?
विचार करून थकले ,
कुणाची मदत मिळेना

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️
*घुसमट*

घुसमट झाली मैना
नको करु ग दैना
पिंजऱ्यात राघू एकला
याद नाही येत का तुला ॥

कोंडलो गेलो आत
वाचवायला कर मदत
गुदमरतो आहे श्वास
तोड बंदिवान टाल्यास ॥

आपातकालीन मार्ग दार
शोधतो निघायला बाहेर
उतरायला नाही पायरी
घुसमटण्यापेक्षा उडी मारी ॥

मिठुमिठु पोपटपंची
उडाली माझीच पंची
डाळींब दाणे पेरूविना
चोच भुकेली पाही फळांना ॥

घुसमटलेले कुविचार
आघाते धडक जोरदार
वाटते तू डोकी मिऱ्या
खाऊ कसा विषासमान
मोतीचारा मिरच्या ॥

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹☢️🔹♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles